पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:जीवनात भक्ती उतरली की प्रत्येक कर्मात सेवाच घडेल
सेवकाला स्वप्नातही सुख मिळत नाही, असे म्हटले जाते. मात्र, लक्ष्मण आणि हनुमान यांसारख्या आदर्श सेवकांनी ही समजूत बदलूनदाखवली. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये म्हटले आहे –”कहइ भसुंड सुनहु खगनायक, राम चरित सेवक सुखदायक।’ म्हणजेचश्रीरामांचे चरित्र सेवकाला सुख देणारे असते. त्यामुळे सेवकाला खरेसुख मिळते ते श्रीरामांशी अर्थात ईश्वराशी जोडले गेल्यावर. सेवाअनेकदा दिखाव्यासाठी, अहंकार वाढवण्यासाठीही केली जाते. परंतुजीवनात भक्तीचा भाव जागृत झाला की प्रत्येक कृती ही सेवाच बनते.आजच्या व्यावसायिक जगात ‘गिग वर्कर’ ही संकल्पना प्रचलित आहे.स्वतःच्या अटींवर, स्वतःच्या वेळेनुसार काम करणाऱ्या व्यक्तीला गिगवर्कर म्हटले जाते. ही सेवेची एक वेगळी व्याख्या ठरू शकते. तसेचएखादी व्यक्ती स्वतःला परमेश्वराशी जोडते. तेव्हा ती त्याच्या इच्छेलासमर्पित होते. वेळ, प्रयत्न, परिणाम सर्व काही ईश्वराचे आहे. अशीत्याची भावना असते. आपण केवळ निमित्त आहोत; खरा कर्ता ईश्वरचआहे.
