पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देवाचे दर्शन घेत राहावे,त्याने डोळे सफल होतात
डोळ्यांतील अश्रू सुकलेला व्यक्ती भक्ती करू शकत नाही. काहीदिवसांपूर्वी मला एक नेत्ररोगतज्ज्ञ भेटले आणि ते म्हणाले, अश्रू हीडोळ्यांची औषधी असते. पण वय वाढते, तसतसे डोळ्यांत कोरडेपणायेतो. जीवनातील काही अनुभव डोळ्यांतील अश्रूही सुकवून टाकतात.म्हणून वृद्ध लोकांनी डोळ्यांच्या बाबतीत अत्यंत सावध राहिले पाहिजे. दोन कामे करा. एक तर काकभुशुंडीजींनी गरुडजींना सांगितले – निज प्रभुबदन निहारि निहारी, लोचन सुफल करउं उरगारी. गरुडजी, आपल्याप्रभूंचे मुख बघून-बघून मी डोळे सफल करतो. म्हणून देवाचे दर्शन घेतराहिले पाहिजे. त्याने डोळे सफल होतात. आणि दुसरी गोष्ट, वेळेवरनेत्रतज्ज्ञांना दाखवत राहिले पाहिजे म्हणजे डोळे स्वस्थ राहतात. प्रभूंचीदर्शनेही डोळ्यांनी दोन प्रकारे होतात – एक बाहेर पाहणे, एक आत पाहणे.डोळ्यांचे हे वैशिष्ट्य आहे की, साधले गेले तर आपण आपल्या आतहीडोळ्यांचा वापर बघण्यासाठी करू शकतो. बाहेरची दुनिया तर डोळेदाखवतेच.
