July 4, 2026

2011 vs 2026 Indian Youth: Chetan Bhagats Analysis

0
enc49w_1781551752.jpg

4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎‎‎कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) पाहता पाहता‎कोट्यवधी समर्थकांचा पक्ष बनला. मात्र हे समर्थक ‎प्रामुख्याने समाजमाध्यमांवर होते; रस्त्यावर नव्हते.‎सीजेपीने जंतरमंतरवर प्रत्यक्ष सभा घेतली व माध्यमांनीही‎ तिचे चांगले वार्तांकन केले. तरीही तेथे केवळ शेकडो‎किंवा काही हजार लोकच उपस्थित होते. भारतातील‎एखाद्या मॉलमध्ये किरकोळ प्रसिद्ध व्यक्ती आली तरी‎यापेक्षा मोठी गर्दी जमते. मग ऑनलाइन आणि प्रत्यक्ष‎उपस्थितीत एवढी तफावत का? जेन-झी पिढी आळशी‎आहे का? की ती फारशी असंतुष्ट नाही आणि तुलनेने‎अधिक आरामदायी जीवन जगत आहे? मात्र असे‎म्हणणे सामान्यीकरण ठरेल. खरे कारण अधिक खोलवर ‎‎आहे. सीजेपी समजून घेणे म्हणजे आजच्या जेन-झी‎पिढीला समजून घेण्याचा एक चांगला मार्ग आहे.‎

सीजेपीची तुलना 2011 मधील भ्रष्टाचारविरोधी‎आंदोलनाशी केली जात आहे. दोन्ही चळवळींनी‎लोकांच्या नाराजीला आवाज दिला. दोन्हींनी तरुणांना ‎‎आकर्षित केले. दोन्ही पारंपरिक राजकीय चौकटीबाहेर‎उभ्या राहिल्या. मात्र सीजेपीला अण्णा हजारे यांच्या 2011‎च्या आंदोलनाइतकेही जनसमर्थन मिळाले नाही.‎यामागील मोठा प्रश्न असा आहे की, स्मार्टफोनच्या युगात ‎‎वाढलेल्या डिजिटल-प्रथम पिढीचा राजकारणाशी‎सामना झाला की काय घडते? कारण 2011 आणि 2026‎यांतील हा मोठा फरक आहे. 2011 मध्ये देशातील बहुतांश‎लोक प्रमुख वृत्तवाहिन्या पाहत होते. त्यांच्या मथळ्यांवर‎चर्चा होत होती. जंतरमंतरवरील आंदोलन राष्ट्रीय बातमी‎बनत असे. कारण सर्वजण एकाच पडद्यावर लक्ष ठेवून‎होते. आज देश अल्गोरिदमने तयार वेगवेगळ्या डिजिटल‎विश्वांत जगत आहे. कोणी यूपीएससीची तयारी करणारा‎विद्यार्थी दिवसभर त्या विषयाचे व्हिडिओ पाहतो. कोणी‎स्टार्टअप क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना अनुसरतो.‎तिसरा सौंदर्यप्रसाधनांच्या मार्गदर्शक चित्रफितींमध्ये‎रमतो. चौथा राजकीय विनोदी संदेशांच्या विश्वात जगतो.‎सर्वजण ऑनलाइन असतात; पण सर्वजण एकाच‎वास्तवाचा अनुभव घेत असतीलच असे नाही. त्यामुळे‎लोकांना एकत्र आणणे आणि संघटित करणे अधिक‎कठीण झाले आहे. 2011 च्या आंदोलनाचा एकच मुद्दा‎होता – भ्रष्टाचार संपवा. देशाला नेमका कशाचा राग‎आहे व काय हवे आहे, हे स्पष्ट होते. सीजेपीचे चित्र‎वेगळे आहे. त्याचे समर्थक बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा,‎प्रश्नपत्रिका फुटी, वाढती महागाई, राजकीय अहंकार,‎संधींचा अभाव आणि तरुणांतील निराशा अशा अनेक‎मुद्द्यांवर बोलतात. या सर्व चिंता खऱ्या आहेत. पण‎समस्या अशी की, तक्रारी खूप आहेत. एका मुद्द्यावर‎देशाला एकत्र आणणे हे दहा मुद्द्यांवर आणण्यापेक्षा सोपे‎असते. दोन्ही चळवळींचा स्वरही वेगळा आहे.‎भ्रष्टाचारविरोधी आंदोलन गंभीर व जवळपास‎आध्यात्मिक स्वरूपाचे होते. लोक गांधी टोपी घालून‎मोर्चांत सहभागी होत. त्यांनी उपोषणेही केली. त्याउलट‎सीजेपी विनोद, उपरोध व व्यंगातून पुढे आली. मात्र या‎पद्धतीत एक अडचण आहे. लाखो लोक त्यात सहभागी‎होऊ शकतात. त्याला पसंती देऊ शकतात, ते पुढे पाठवू‎शकतात; पण प्रत्यक्ष चळवळीचा भाग बनतीलच असे‎नाही. लाखो तरुण रोजगार, परीक्षा व संधींच्या प्रश्नांशी‎जोडले जात असतील तर ते पूर्णपणे समाधानी आहेत‎असे म्हणता येणार नाही. नाराजी खरी आहे. प्रश्न एवढाच‎की ती व्यक्त कशी केली जाते. जुनी पिढी राजकारणाकडे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून पाहते – आंदोलन, निदर्शने,‎धरणे, मोर्चे. पण जेन-झी वेगळ्या साधनांसह वाढली‎आहे – पोस्ट करणे, प्रतिक्रिया देणे, सामायिक करणे व‎आशय तयार करणे. याच ठिकाणी जुन्या आणि नव्या‎पिढीत गैरसमज निर्माण होतो. एखादा ज्येष्ठ विचारू‎शकतो, तुम्ही इतके नाराज असाल, तर रस्त्यावर का‎नाही? त्यावर एखादा तरुण म्हणू शकतो, माझी पोस्ट‎लाखोंनी पाहिली असेल, तर रस्त्यावर येण्याची गरज‎काय? 2011 मध्ये लोकांना आपले म्हणणे ऐकले जात‎नाही असे वाटले, तर ते एकत्र येत . 2026 मध्ये लोकांना‎आपले म्हणणे ऐकले जात नाही असे वाटले, तर ते पोस्ट‎करतात. समाजमाध्यमे एका बाजूला आवाज‎वाढवण्याचे साधन बनली. दुसऱ्या बाजूला नाराजी व्यक्त‎करून मन मोकळे करण्याचा मार्गही ठरली आहेत.‎इंटरनेट राजकीय ऊर्जेचा मोठा भाग स्वतःमध्ये सामावून‎घेते. ते पूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलनात रूपांतरित होत‎असे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

QuoteImage

ही एखाद्या कमकुवत किंवा आळशी‎पिढीची कथा नाही. राजकारण वेगळ्या‎पद्धतीने व्यक्त करणाऱ्या पिढीची ही कथा‎आहे. निषेधाचा फलक उचलण्याआधी या‎पिढीचा हात आपल्या फोनकडे‎सरसावतो. मात्र प्रश्न कायम आहे -‎डिजिटल रोष खऱ्या जगात बदल घडवू‎शकतो का?‎

QuoteImage

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!