नवनीत गुर्जर यांचा कॉलम: शेवटी आपल्या दिवसाच्या अंगणातरात्री कधीपर्यंत उतरत राहतील? – Navneet Gurjar Column: Analysis of Politics and Social Decay
15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

आजची परिस्थिती ही आपल्याच ओठांतून निघालेलीएक भयानक किंकाळी आहे. …आणि आपण तुटतचाललो होतो, आपण या किंकाळीचेही तुकडे केले.जाटांची किंकाळी, ब्राह्मणांची आणि राजपुतांचीकिंकाळी असे म्हणत तिचे नामकरण केले. लेथब्रेजनावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी पेंडुलमच्यामदतीने जमिनीत दडलेल्या शक्तींचा शोध घेतला व वेगवेगळ्या शक्ती ओळखण्याचे संकेत निश्चित केले. याच लेथब्रेज यांनी विशिष्ट दगडांचीही पाहणी केली. ते कधीकाळी प्राचीन युद्धात वापरले गेले होते. त्यांना असे आढळून आले की, या दगडांवर द्वेषाच्या खुणा खोलवर उमटल्या होत्या. त्यांचा पेंडुलम संकेत देत होता. जेत्याने मृत्यूसाठी दिला होता.
खरे तर कुणाला तरी जखमी करण्यासाठी वापरलाजातो तोही दगड असतो आणि महात्मा बुद्धांचे वज्रासनबनतो तोही एक दगड असतो. दगड आपल्या रक्तानेहीभिजू शकतात आणि आपण त्यांना एखाद्या आसनावरबसवून त्यांची प्राणप्रतिष्ठाही करू शकतो. वास्तविकसंपूर्ण राजकारणच दगड बनले आहे. सत्ताधारी कायआणि विरोधक काय! सर्वजण आपले राजकारणचमकवण्यात गुंतले आहेत. सामान्य माणसाच्याभल्याची चिंता ना पूर्वी कुणाला होती, ना आता कुणीकरत आहे. आपण आजही तसेच आहोत.
पैशांचीआवक नक्कीच काहीशी वाढली आहे. शहरांमध्येआयुष्याचा सूर्य घाबरतच प्रकाशाची खिडकी उघडतो.महागाई, हिंसाचाराच्या धुराचे लोट पाहून अंधाराच्यापायऱ्या उतरू लागतो. निश्चितच देशवासीयांनी हा प्रश्नसर्व जबाबदार लोकांना विचारला पाहिजे की, शेवटीअशा प्रकारे आपल्या दिवसाच्या अंगणात रात्रीकेव्हापर्यंत उतरत राहतील? काळ्याकुट्ट इतिहासाच्यागालांवरून अश्रू कोण पुसणार? स्वातंत्र्यानंतरच देशानेहे चांगलेच ओळखले आहे की पोटाच्या आगीचे दोनचपैलू आहेत – एक भट्टी, दुसरी आग. भट्टी म्हणजे संपूर्णदेश. आणि आग तर समर्थ आहेच. तिच्यासमोरकुणाचेही काही चालले नाही. ना राज्य सरकारचे, नाकेंद्राचे. तुलसीदास म्हणून गेले आहेत – ‘समरथ कोनहीं दोष गुसाईं, रवि पावक सुरसरि की नाईं”(सामर्थ्यवान व्यक्तीला कोणताही दोष लागत नाही. ).शेवटी कोट्यवधी लोकांना मोफत धान्य मिळूनही तेआत्मदहनास का प्रवृत्त होत आहेत? सर्व सोयीसुविधा,भेटवस्तू व सवलती असूनही देशातील अनेक लोकांचेजगणे का असह्य झाले? त्यांची घरे, जणू स्वतःचाचपत्ता विचारत आहेत. अंथरुणांवर सन्नाटा आहे.
त्यांचाचंद्र म्हणजे पिंपळाचे सुके पान. त्यांच्या रात्री सुंसुं करतवाहणाऱ्या वाऱ्यासारख्या भयाण. …आणि चेहरा जणूआभास उरला आहे. कुणाची हिंमत आहे का, कीकोणतेही सरकार, विरोधक किंवा इतर कुणी जबाबदारव्यक्ती आपल्याच शहरात परके झालेल्या या लोकांशीजाऊन दोन शब्द बोलतील, जेणेकरून त्यांचे दुःखहलके होईल! जिवंत समाजाच्या जिवंत नेत्यांनो, जराअश्रू तर पुसा! भटकणाऱ्या लोकांना काहीतरी निवारातर द्या. असंख्य लोक एखाद्या तंबूत, निवारा केंद्रात ,फुटपाथवर अश्रू ढाळत आहेत.
आकाशाकडे शून्यनजरेने पाहत आहेत. आता तर चंद्रातही भाकरीचदिसते! हे नेते कुणाचेच झाले नाहीत, कोणत्या मातीचेबनले आहेत? दुर्दैव हे की, यांना निवडून देणारेहीआपणच आहोत. सातत्याने. अखंडपणे. अडचणी,अपमान आणि द्विधा मनःस्थितीला आपणच जबाबदारआहोत. हे खरे आहे की शरीर आहे, तोपर्यंत या यातनाभोगाव्याच लागतील. आणि दुसरा काही उपायही नाही.कारण मत देण्याची प्रवृत्ती काही बदलणार नाही!गुलजार यांनी याच परिस्थितीवर अत्यंत समर्पक लिहिलेआहे – “जिस्म सौ बार जले, तब भी वही मिट्टी काढेला। रूह इक बार जलेगी, तो वो कुंदन होगी!’
जिवंत समाजाच्या जिवंत नेत्यांनो, जराअश्रू तर पुसा! भटकणाऱ्या लोकांनानिवारा तर द्या. असंख्य लोक तंबूत,निवारा केंद्रात किंवा फुटपाथवर पडूनआहेत. आकाशाकडे शून्य नजरेने पाहतआहेत. आता चंद्रातही भाकरीच दिसते!

