नरेंद्र मोदी यांचा कॉलम: आपली राज्यघटना देशासाठी पथदर्शक
9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

26 नोव्हेंबर 1949 रोजी आजच्या दिवशी संविधानसभेने राज्यघटनेचा स्वीकार केला होता. आज आपण डॉ.राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानसभेच्या सर्व सदस्यांचे स्मरण करतो. भारतासारख्याविविधतेने नटलेल्या देशात संविधानाचा गजर संसदआणि न्यायालयांच्या पलीकडे पोहोचणे अत्यंत गरजेचेआहे. जनसामान्यांच्या चेतनेशी, विशेषतः तरुणांशीसंविधानाची नाळ अधिक घट्ट जोडली जावी, असाआमचा प्रयत्न राहिला. याच विचाराने एका दशकापूर्वीआमच्या सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिनम्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
आपले संविधान माझ्यासह कोट्यवधी भारतीयांच्याजीवनप्रवासाचा अविभाज्य भाग आहे. एका सामान्यकुटुंबात जन्मलेला मुलगा – वारशाने कोणताहीविशेषाधिकार किंवा सुविधा मिळाली नाही तो एक दिवसजगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सेवेची जबाबदारीसांभाळू शकतो – हे आपल्या संविधानाच्या असामान्यशक्तीचे प्रमाण आहे. आपण विनम्र प्रयत्नांनीसंविधानाला अधिक सशक्त बनवून कृतज्ञतेचे हे ऋणफेडण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक बँकेचा ताजाअहवाल सांगतो की, भारतातील सुमारे 50 कोटी लोकअत्यंत दारिद्र्यातून बाहेर पडले आहेत. पिढ्यान्पिढ्याचालत आलेल्या अभावातून मुक्त होऊन आजकोट्यवधी माता-पिता मुलांच्या चांगल्या भविष्याचे स्वप्नपाहू शकतात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातूनएखाद्या कुटुंबाला झोपडीतून बाहेर पडून पक्क्या घरातगृहप्रवेश करण्याची संधी मिळते. तेव्हा सन्मानाने जीवनजगण्याचा संविधानिक संकल्प खऱ्या अर्थाने साकारहोतो. उज्ज्वला योजना एखाद्या मातेला धुराने भरलेल्या स्वयंपाकघरातील त्रासातून मुक्त करते. तेव्हा आपणसमानता आणि जनकल्याणाच्या आदर्शांना पुढे नेतो. आयुष्मान भारतामुळे एखाद्या गरीब कुटुंबाला कर्जाचीचिंता न करता चांगले उपचार मिळतात. तेव्हा त्यांच्या जीवनात सामाजिक न्यायाचा संकल्प साकार होतो. मुद्रा योजना आणि पीएम स्वनिधीअंतर्गत छोटे उद्योजक आणि फेरीवाल्यांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळते, तेव्हा आर्थिक न्यायाची संविधानिक भावना प्रत्यक्षात उतरते. डिजिटल तंत्रज्ञान, रुपे कार्ड आणि यूपीआय यांसारख्या प्लॅटफॉर्मपर्यंत प्रत्येक नागरिकाची पोहोच होते तेव्हा समावेशकतेचा संविधानिक आदर्श साकार होतो.आमच्या सरकारने केलेल्या घटनादुरुस्त्यांकडेही याच दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते. 101 व्याघटनादुरुस्तीमुळे जीएसटीसारख्या मोठ्या सुधारणेचामार्ग मोकळा झाला. त्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. 102 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला. यामुळेसमाजातील वंचित घटकांचे स्वप्न पूर्ण झाले. आमच्या सरकारच्या 103 व्या घटनादुरुस्तीचेही लोकांनी कौतुककेले. याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली. आपल्याइतिहासातील काही प्रसंग नीट लक्षात घ्यावेत.संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी होती त्याच लोकांनीसंविधान कमकुवत करण्याचा मार्ग निवडला. दुर्दैव पाहाकी याच लोकांना पाच दशकांपर्यंत देशाची धुरासांभाळण्याची संधी मिळाली. 1951 मध्ये झालेल्यापहिल्या घटनादुरुस्तीला यंदा 75 वर्षे पूर्ण झाली. त्या वेळीदेशातील सरकार हे जनतेने निवडून दिलेले नव्हते. त्यासरकारने हंगामी संसदेतील बहुमताचा वापर करूननागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. हीदुरुस्ती देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काहीमहिने आधीच केली होती. यावरून हे स्पष्ट होते की,तिचा उद्देश निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणे, लोकांच्याविरोधाचा आवाज दाबणे हा होता. त्याचप्रमाणेआणीबाणीच्या काळात केलेल्या 42 व्याघटनादुरुस्तीलाही 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या दुरुस्तीनेन्यायिक पुनरावलोकनाची शक्ती मर्यादित केली. देशाच्यासंस्थांमधील अधिकारांचे संतुलन मूलभूतरीत्या बदलूनटाकले. मी तरुणांना असाही आग्रह करेन की त्यांनी 38व्या आणि 39 व्या घटनादुरुस्तीचाही अभ्यास करावा.यातून त्यांना समजू शकेल की सत्तेची लालसा असलेलेसरकार कोणत्या थराला जाऊ शकते. निवडून आलेलीराज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी कलम 356 चागैरवापर हादेखील आपल्या इतिहासातील एकचिंताजनक अध्याय आहे. एका राजकीय पक्षाच्या नावावरसुमारे शंभर वेळा कलम 356 लादल्याचा विक्रम नोंदवलागेला. एका माजी पंतप्रधानांनी तर या बाबतीतअर्धशतकही पूर्ण केले आहे. भारतात संविधान आपल्यामूळ स्वरूपात आणि मूळ भावनेसह लागू व्हावे, अशीघटनाकारांची अपेक्षा होती. परंतु 70 वर्षांहून अधिककाळ कलम 370 आणि 35-ए मुळे जम्मू-काश्मीरमध्येसंपूर्ण संविधान लागू होऊ शकले नाही. तिथे एससी,एसटी, ओबीसी आणि महिलांच्या अधिकारांचे उल्लंघनहोत राहिले. 2019 मध्ये या ऐतिहासिक अन्यायाचा अंतझाला. दशकानुदशके देशाच्या अनेक भागांत विशेषतःआदिवासी भागांत, नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या जोरावरसर्वात गरीब व्यक्तीला संविधानाने दिलेल्या हक्कांपासूनवंचित ठेवले होते. या वर्षी नक्षलवादाच्या उच्चाटनामुळेमला विशेष समाधान मिळाले आहे. शस्त्रधारी नक्षलवादीसंपल्यानंतर आता केवळ वैचारिक नक्षलवादी उरलेआहेत. ते आजच्या काळातील वास्तवापासून खूप दूरआहेत आणि देशाचा विकास-प्रवास रुळावरूनघसरवण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. हे अत्यंत दुर्दैवीआहे की विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष ओबीसीआरक्षणात कपात करून मुस्लिमांना आरक्षण देऊइच्छितो. आपले संविधान निर्माते विशेषतः डॉ. बाबासाहेबआंबेडकर या गोष्टीच्या पूर्ण विरोधात होते. या वर्षाच्यासुरुवातीला नारीशक्तीला विधिमंडळ संस्थांमध्ये पुरेसेप्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने आणलेले विधेयकहीविरोधी पक्षातील एका प्रमुख पक्षाने मंजूर होऊ दिले नाही.पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले की घटनात्मकमूल्यांबद्दल त्यांच्या मनात किती कमी आदर आहे.
आपल्या घटनात्मक लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिकास्पष्ट आहे. दुर्दैवाने विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्षआज ‘विरोधी पक्ष” असण्यापेक्षा ‘अडथळा पक्ष” बनतचालला आहे. त्यांनी हे समजून घ्यावे की लोकशाहीप्रक्रियेत अडथळे आणणे, हा आपल्या घटनात्मकजबाबदाऱ्या पार पाडण्याचा पर्याय कधीही असू शकतनाही.
राष्ट्र प्रथम आणि कर्तव्यभावनाआज भारत एका महत्त्वाच्या वळणावरउभा आहे. 2047 पर्यंत विकसित भारतघडवण्याच्या आपल्या प्रयत्नांना दोन साधेपण शक्तिशाली मंत्र दिशा देऊ शकतात -विचारांत ‘राष्ट्र प्रथम’ आणि कृतीमध्ये‘कर्तव्यभावना’. या दोन मंत्रांना मार्गदर्शकबनवून आपण येणाऱ्या पिढ्यांचे उज्ज्वलभविष्य निश्चित करू शकतो.

