आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:‘ओळख’-राजकारणाच्या मर्यादा आता स्पष्ट होऊ लागल्या आहेत
आकडेवारीच्या दृष्टीने पाहिले तर मध्यावधी निवडणुकांतट्रम्प यांना मोठा पराभव पत्करावा लागला. ओबामा यांनाही2010 च्या मध्यावधी निवडणुकीत पराभवाचा सामनाकरावा लागला होता. जरी या निवडणुकांत अध्यक्षांचे नावबॅलेटवर नसले, तरी मध्यावधी निवडणुका या अध्यक्षांच्याकामावर जनतेचे मत मानल्या जातात हे प्रत्येकाला ठाऊकआहे. 2026 मध्ये ट्रम्प यांचा झालेला पराभव 2010 मधीलओबामा यांच्या पराभवापेक्षा मोठा आहे, कारण त्या वेळीडेमोक्रॅट्स सिनेटमध्ये अल्प बहुमत टिकवण्यात यशस्वीठरले होते. ट्रम्प दोन्ही सभागृहांत पराभूत झाले. आताकायदेमंडळ त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे. अमेरिकेत निवडणुकीचा नकाशा बदलण्याबाबत दीर्घकाळापासून संघर्ष चालला आहे, जेणेकरून सत्तेत असलेल्यांना फायदा व्हावा, निवडणुकीतील स्पर्धात्यांच्या बाजूने झुकावी. याला ‘जेरीमँडरिंग” किंवा मतदारसंघांची नव्याने पुनर्रचना असे म्हटले जाते. अमेरिकेतील अनेक राज्यांत दर दहा वर्षांनी असेकरण्याची परवानगी आहे. अमेरिकेची ही पद्धत हंगेरी अलीकडच्या काळात भारतापर्यंतही पोहोचली. ट्रम्प यांनी अनेक राज्यांत दहा वर्षांच्या निश्चित कालावधीआधीच मतदारसंघांची नव्याने पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला.त्यांचा सर्वाधिक भर टेक्सासवर होता. हे अमेरिकेतीलदुसरे सर्वात मोठे राज्य आहे. रिपब्लिकन्सच्यानियंत्रणाखालील सर्वात मोठे राज्यही आहे. ट्रम्प याराज्याच्या विधानसभेकडून आपल्या बाजूने पाचमतदारसंघ बनवून घेण्यात यशस्वी ठरले. परंतु ते यापैकीएकाच ठिकाणी जिंकू शकले. इतर काही राज्यांमध्येहीअसेच घडले. यावरून असा धडा मिळतो की,निवडणुकीतील स्पर्धा आपल्या बाजूने झुकवण्याच्याप्रयत्नांनाही पराभूत केले जाऊ शकते, अट एकच कीविरोधी पक्षांनी जनतेचा पाठिंबा मिळवला पाहिजे. मोठ्याफरकाने मिळालेला विजय ‘जेरीमँडरिंग”वर मात करूशकतो. काही महिन्यांपूर्वी हंगेरीनेही हाच संदेश दिलाहोता. ‘जेरीमँडरिंग”च्या माध्यमातून तयार केलेल्यामतदारसंघांमध्येही विजय मिळवला जाऊ शकतो.दुसरीगोष्ट, जर लोकशाहीत निवडणुकांवरच विश्वास ठेवलागेला, तर ती सत्तेत बसलेल्यांच्या मनमानीचे साधनबनण्याचा धोका असतो. ट्रम्प यांच्यावर काही अंकुशराहिला असेल, तर तो न्यायव्यवस्थेकडून होता. विशेषतःखालच्या फेडरल न्यायालयांनी त्यांच्या निर्णयांना स्थगितीदिली होती. कायदेमंडळाकडून अंकुश नव्हता, कारणकाँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रणहोते. अमेरिकन राजकारणाचा जुना सिद्धांत ‘विभाजितसत्तेसह शासन” पुन्हा परतत आहे. अध्यक्षांकडेकायदेमंडळाने संमत केलेल्या विधेयकांवर व्हीटो(नकाराधिकार) वापरण्याचा अधिकार असतो. परंतुव्यावहारिकदृष्ट्या प्रत्येक विधेयकावर व्हीटो वापरणेशक्य नसते. आता कायदेमंडळाचे उत्तरदायित्व पुन्हा सुरूहोईल. सरकार, कायदेमंडळ यांच्यात संघर्षही पाहायलामिळू शकतात.तिसरी गोष्ट, ओळखीच्या राजकारणालामोठा धक्का बसला. ट्रम्प यांच्या राजकारणाची मोठीताकद श्वेत बहुसंख्याकवाद ही होती. याला हिस्पॅनिकसमुदायाचाही पाठिंबा मिळाला होता. कृष्णवर्णीयअमेरिकनांसोबत हिस्पॅनिक हा अमेरिकेतील मोठाअल्पसंख्याक समुदाय आहे. परंतु हिस्पॅनिक मोठ्यासंख्येने डेमोक्रॅटिक पक्षाकडे परतले. वास्तविक,मतदारांच्या महत्त्वाच्या गटांमध्ये डेमोक्रॅट्सकडे पुनरागमनदिसून आले आहे. काहींमध्ये हे प्रमाण कमी आहे, तरकाहींमध्ये जास्त.लोकांची ओळख त्यांच्या हितांपेक्षाजास्त महत्त्वाची असते का? राजकीय विश्लेषणात याप्रश्नावर चर्चा होत राहिली आहे. याचे कोणतेही एक उत्तरसर्व वेळी आणि सर्व ठिकाणी लागू होत नाही.परिस्थितीनुसार उत्तरे बदलतात. ट्रम्प ओळखीच्याराजकारणात माहीर होते, परंतु रोजच्या गरजांशीजोडलेल्या मुद्द्यांसमोर त्यांचे हे राजकारण कमजोरपडले. राजकीय विचारवंत हन्ना पिटकिन त्यांच्या‘वर्णनात्मक प्रतिनिधित्व” या संकल्पनेसाठी ओळखल्याजातात. याद्वारे त्यांचा अर्थ असा होता की, निवडूनआलेल्या संस्था लोकसंख्येच्या काही महत्त्वाच्याओळखींच्या – जसे की वांशिक आणि सामाजिक गटांच्याआधारे तिचे किती प्रतिनिधित्व करतात. भारतात याशब्दाचा अर्थ जात, धर्म आणि भाषा असा राहिला आहे.अमेरिकेत याचा अर्थ वंश, वांशिक ओळख, लिंग असाराहिला आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ट्रम्प ओळखीच्या राजकारणात माहीरहोते, परंतु रोजच्या गरजांशी जोडलेल्यामुद्द्यांसमोर त्यांचे हे राजकारण कमजोरपडले. हिस्पॅनिक डेमोक्रॅटिक पक्षाकडेपरतले आहेत. वास्तविक, मतदारांच्या सर्वमहत्त्वाच्या गटांमध्ये डेमोक्रॅट्सकडेपुनरागमन दिसून आले आहे.
