मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:देशात समृद्धी हळू का होईना पण वाढली आहे
भारतात गरिबी कमी होत आहे का? जागतिक बँकेचे तरहेच मानणे आहे. आपल्या ताज्या ‘पॉव्हर्टी अँड इक्विटीब्रीफ” (गरीबी आणि समानता अहवाल) मध्ये या संस्थेनेसांगितले आहे की, गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱ्याभारतीयांची संख्या घटून 2.6% राहिली आहे. 2004 मध्ये53 कोटी भारतीय भीषण गरिबीत जीवन जगत होते. हेदेशाच्या एकूण लोकसंख्येच्या 46.4% होते. महागाईचाप्रभाव समायोजित करून गरिबी रेषेचे तेच निकष लागूकेल्यास 2023 मध्ये अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्याभारतीयांची संख्या केवळ 5.3 कोटीच राहिली होती. अशाप्रकारे मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी- या दोघांच्याकार्यकाळाचा समावेश असणाऱ्या या 20 वर्षांत सुमारे 50कोटी भारतीय गरिबी रेषेच्या वर आले. जमिनी स्तरावर मिळणारे अनुभवजन्य पुरावे याआकलनाला पुष्टी देतीलच असे नाही. असे असूनहीजागतिक बँक म्हणते की, अत्यंत गरिबीत झालेली तीव्रघसरण आणि सुमारे 50 कोटी लोकांचे गरिबीच्या एकाउच्च उत्पन्न-निकषाच्या वर येणे हे आधुनिक युगातीलसर्वात उल्लेखनीय यशांपैकी एक आहे. भारताला ब्रिटिश राजवटीकडून एक डबघाईस आलेलीअर्थव्यवस्था वारशाने मिळाली होती. 1947 मध्ये देशातील80% पेक्षा जास्त लोकसंख्या अत्यंत गरीब होती. यानंतरहीसुधारणेची प्रक्रिया मंदच राहिली. 1977 पर्यंत अत्यंतगरिबीचा दर हळूहळू घटून 59.7% पर्यंत पोहोचला. 2004मध्येही हा 46.4% होता. वास्तविक सुधारणा 2011 नंतरसुरू झाल्या, जेव्हा अत्यंत गरिबीचा दर घटून 27.1%राहिला. यानंतर घसरणीचा वेग वाढला. 2022 पर्यंत अत्यंत गरिबीचा दर घटून 5.3% वर आला आणि 2023 मध्ये अर्धा होऊन 2.6% राहिला. परंतु सामान्य भारतीयांना अत्यंत गरिबीत झालेल्या या ऐतिहासिक घसरणीचा परिणाम जाणवत का नाही? याचेएक कारण असे आहे की, जागतिक बँकेने अत्यंत गरिबीची व्याख्या ठरवण्यासाठी खूप कमी उत्पन्न-मर्यादा निश्चितकेली आहे : दररोज 3 डॉलर. ही स्पष्टपणे स्वीकारार्ह मर्यादा नाही. जर ही उत्पन्न-मर्यादा वाढवून 4.2 डॉलर केली, तर गरिबी रेषेखाली जीवन जगणाऱ्यांचे प्रमाण वाढून 16.1%होते. ही आकडेवारी भारतातील अत्यंत गरिबीच्या दरावर केलेल्या इतर अनेक अभ्यासांच्या व्याप्तीत येते, ज्यामध्येसुरेश तेंडुलकर समितीच्या अहवालाचाही समावेश आहे. जर अजूनही 16.1% किंवा 23 कोटी भारतीय घोर गरिबीत असतील, तर याचा अर्थ अजून ध्येय साध्य झालेले नाही.81% कुटुंबांना मिळत असलेले कल्याणकारी फायदे आणि मोफत रेशनने खाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई आणि बेरोजगारीच्या दुहेरी माराशी लढण्यास मदत नक्कीच केली आहे.खरं सांगायचे तर भारतात तीन वेगवेगळे देश दिसूनयेतात. पहिला भारत उत्पन्नाच्या दृष्टीने अव्वल 10 टक्के भारतीयांचा आहे. हे सुमारे 15 कोटी संपन्न लोक आहेतआणि वेगाने वाढणाऱ्या उच्च-मध्यमवर्गाचा भाग आहेत.यांच्याकडे शेअर्स आहेत, हे वारंवार प्रवास करतात आणियांचे राहणीमान लॅटिन अमेरिकेतील मध्यम-उत्पन्नअसलेल्या देशांतील लोकांच्या राहणीमानाइतके आहे. दुसरा भारत मध्यभागी स्थित आहे. यामध्ये सुमारे 50 टक्केम्हणजेच 70 कोटी भारतीय येतात. यांच्याकडे मर्यादितसंसाधने आहेत, ते मोठे कर्ज घेतात आणि त्यांना सुरक्षित वचांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. यांच्यामध्येचांगल्या आयुष्याची आकांक्षा आहे आणि हे आर्थिकशिडीवर वर चढण्याच्या प्रयत्नात आहेत. तिसऱ्या श्रेणीतील अनेक लोक छोटे-मोठे काम-धंदेकरतात. यामध्ये एक मोठी लोकसंख्या लहानशेतकऱ्यांचीही आहे, ज्यांचे जीवन एका पिकापासून दुसऱ्यापिकापर्यंत कसेबसे चालते. जेव्हा मान्सून अपयशी ठरतो,जसे की या वर्षी भारताच्या काही भागांत झाले आहे, तेव्हात्यांना सावकारांकडून अवाजवी व्याजदराने कर्ज घ्यावेलागते. अशा व्याजाची परतफेड करण्याची उमेदही ते बाळगूशकत नाहीत. हेच कारण आहे की भारतात दरवर्षी 10,000पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात.गेल्या काही वर्षांतभारतासोबत हे दुर्दैव राहिले आहे की, त्याला अशा घटनांचाफटका सहन करावा लागला आहे, ज्यांच्यावर त्याचेकोणतेही नियंत्रण नव्हते. कोविड महामारीने भारताच्याआर्थिक विकास दराची दोन वर्षे हिरावून घेतली. इराणयुद्धाने व्यापारात अडथळा आणला आहे. अमेरिकनबाजारातून ऑर्डर्स मिळणे बंद झाल्यामुळे सुरतचे हिरेतराशणारे आणि पॉलिश करणारे कारागीर गरिबीच्याविळख्यात आले आहेत. क्रूडच्या किमतीतील वाढीमुळेखाण्यापिण्याच्या वस्तूंची महागाई वाढली आहे. एआय मुळेसुरुवातीच्या स्तरावरील अनेक नोकऱ्या अप्रस्तुत होतआहेत.परंतु अमेरिकेत ट्रम्प यांच्या पराभवानंतर वातावरणबदलले आहे. शेअर बाजारात तेजी आहे, रुपया मजबूतझाला आहे, तेलाच्या किमती घसरत आहेत आणि पुढीलमान्सूनमध्ये ला निनाच्या प्रभावाने चांगला पाऊस होण्याचीआशा आहे. भारतातील गरिबी कमी होण्याबाबत जागतिकबँकेचा आशावाद खरा ठरण्याची शक्यता आहे, कारणपरदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारताकडे वळत आहेत.वाढत्या अर्थव्यवस्थेचा फायदा देशातील या तिन्ही घटकांनावेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या वेळी मिळत राहिलाआहे. आर्थिक विकासाचे फायदे हळूहळू खालच्याघटकांपर्यंत पोहोचले आहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) योग्य दिशेने असलेला आशावाददेशातील गरिबी कमी होण्याबाबतजागतिक बँकेचा आशावाद खरा ठरूशकतो, कारण परदेशी गुंतवणूकदार पुन्हाएकदा देशाकडे वळत आहेत. वाढत्याअर्थव्यवस्थेचा फायदा देशातील तीनवेगवेगळ्या उत्पन्न-गटांना वेगवेगळ्याप्रकारे,वेगवेगळ्या वेळी मिळतच राहिला .आर्थिक विकासाचे फायदे हळू का होईनापण खालच्या घटकांपर्यंत पोहोचले आहेत.
