पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मायेमधून निर्मित भ्रम खऱ्या भक्ताला कधी त्रास देत नाही
श्रीरामांनी काकभुशुंडींना सांगितले होते- “माया संभव भ्रम सब अब नब्यापिहहिं तोहि.’ म्हणजेच, मायामुळे निर्माण झालेला कोणताही भ्रमआता तुला सतावणार नाही. मानवी जीवनावर माया हावी होते. तेव्हामाणूस भ्रमात पडतो. सुख-दुःख नेमके किती खरे आणि किती खोटे,हेच त्याला समजेनासे होते. मायेला सोप्या भाषेत ‘जादू” म्हणतात आणि इंग्रजीत ‘इल्यूजन” म्हणतात. आपण जादूगाराचा खेळ पाहायलाजातो. तेव्हा प्रत्येक खेळ खरा वाटतो. पण तसे काहीच नसते. हीच तरमाया आहे. परमात्म्याला ‘मायापती” म्हणतात. कारण ईश्वर हा मोठाजादूगर आहे. खऱ्या भक्ताला ईश्वराची ही माया सतावत नाही. त्यामागेकारण आहे. ईश्वर या मायेच्या माध्यमातूनच जगाची निर्मिती करतो. याशक्तीचे काम म्हणजे माणसाला ‘तू एक आत्मा आहेस, शरीरातआहेस, अशी जाणीव करून देणे. म्हणूनच श्रीराम सांगत आहेत की,माझी माया तुला सतावणार नाही आणि तू मोह अन् अज्ञानातून बाहेरपडशील. तू जगात राहशील, पण हे जग तुझ्या मनात नसेल . हाच खराआनंद आहे!
