सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:आपल्या भूतकाळाचा वारसा जतनकरण्याची जबाबदारी आपलीच
दीदारगंजची प्रसिद्ध यक्षी मूर्ती 1917 मध्ये गंगा नदीच्याकाठी सापडली होती. आज पाटणा येथील बिहारसंग्रहालयात येणारे पर्यटक पॉलिश केलेल्या बलुआदगडातील त्या मूर्तीसमोर उभे राहून तिची निर्मितीकरणाऱ्या मूर्तिकाराच्या कौशल्याचे कौतुक करूशकतात. परंतु, तिच्या शोधापासून ते आजसंग्रहालयाच्या दालनात तिची प्रतिष्ठापना होईपर्यंतचाप्रवास हा धैर्य व सततच्या प्रयत्नांची कहाणी सांगतो.अनेक पिढ्यांनी मिळून ही मूर्ती जतन करण्यात योगदानदिले आहे. एका संस्थेने ती सर्वसामान्य जनतेसमोरआणणे शक्य केले आहे. ‘वर्थ अ जर्नी’ या पर्यटन नियतकालिकाने जगातील 100 सर्वोत्कृष्ट संग्रहालयांच्या यादीत बिहार संग्रहालयाला जागतिक स्तरावर नववे व आशियात पहिले स्थान दिले आहे. या यादीत बिहार संग्रहालयाने न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट” आणि पॅरिसच्या जगप्रसिद्ध ‘लूव्र” संग्रहालयालाही मागे टाकले . हासन्मान निश्चित स्वागतार्ह आहे. आपण बिहारमधील नालंदा, बोधगया, राजगीर, वैशाली व या भूमीचाइतिहास सांगणाऱ्या अशाच इतर अनेक ठिकाणांना भेटदेणाऱ्या पर्यटकांचा अनुभवही तितक्याचसंवेदनशीलतेने आणि काळजीपूर्वक समृद्ध करूशकतो. या संग्रहालयाची संकल्पना मांडणे, त्यासाठीनिधी उपलब्ध करून देणे आणि ते सातत्याने चालवणेयाचे श्रेय बिहार सरकारला जाते. तत्कालीन मुख्यमंत्रीनितीश कुमार यांच्या दूरदृष्टीमुळे बिहारच्या ऐतिहासिकमहत्त्वाच्या वस्तू व शिल्पांना त्यांच्या महत्तेनुसार एकयोग्य आश्रय मिळाला. संग्रहालयाचे महासंचालकराहिलेले अंजनी कुमार सिंह यांच्या नेतृत्वाचाही येथेआवर्जून उल्लेख करावा. 1917 मध्ये स्थापन झालेल्यापाटणा संग्रहालयाने या यशाचा पाया रचण्यात मोठीभूमिका बजावली होती. आपल्या नवीन सुविधा आणिदालनांसह आजही ती एक प्रतिष्ठित संस्था म्हणून उभीआहे. ही दोन्ही संग्रहालये पर्यटकांना बिहारचा इतिहासजाणून घेण्याच्या संधी देतात. ही दोन्ही संग्रहालये मिळूनपाटणाला विशिष्ट शहर बनवतात. येथून बिहारच्याइतिहासाचा प्रवास सुरू होऊ शकतो. जपानच्या ‘माकीअँड असोसिएट्स” आणि मुंबईच्या ‘ओपोलिस”ने येथेदालने, खुल्या अंगणांची अशी साखळी तयार केलीआहे. तेथे पर्यटक आपल्या गतीने संग्रहालय पाहू आणिसमजून घेऊ शकतात. आतमध्ये मौर्य, गुप्त आणि पालराजघराण्यांसोबतच बौद्ध आणि जैन परंपरांची माहितीमिळते. प्रादेशिक व समकालीन कला आणि स्थलांतरितबिहारींना समर्पित एक दालन बिहारची सांस्कृतिकजीवनधारा कशी विकसित होत राहिली. हे दाखवते.बाल दालनात मुले स्वतः विविध उपक्रमांत भाग घेऊनशिकू शकतात. एखादे मूल संग्रहालयातून परतताना तिथेपाहिलेल्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारत असेल तर समजाकी या भेटीतून त्याने काहीतरी नक्की मिळवले आहे.बिहारच्या राज्यपालपदाची सूत्रे घेतल्यापासूनचबिहारकडे भारत आणि जगाला देण्यासारखे खूप काहीआहे, असे सांगत आलो आहे. हा वारसा मांडण्याचीपद्धत किती महत्त्वाची आहे, हे संग्रहालय दाखवून देते.नालंदाच्या अवशेषांमध्ये फिरताना पर्यटकालाएकेकाळी इथे विद्वान कसे अध्ययन, शास्त्रार्थ आणिविचारांची देवाणघेवाण करायचे, याची जाणीव झालीपाहिजे. बोधगया येथे पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधांचीकाळजी घेतानाच त्या स्थानाचे धार्मिक पावित्र्य आणिवैशिष्ट्य जपले गेले पाहिजे. राजगीर व वैशालीचाहीआपला वेगळा इतिहास आहे. तो पर्यटकांसमोर सोप्याआणि सुटसुटीत पद्धतीने मांडला गेला पाहिजे. बिहारसंग्रहालय या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांसाठी एक आदर्शवस्तूपाठ घालून देते. एखाद्या ठिकाणाबद्दल प्रभावीपणेदिलेली माहिती लोकांना तिथे अधिक वेळघालवण्यासाठी प्रेरित करते. जतन आणि संवर्धनाचेकाम ती जागा येणाऱ्या पिढ्यांसाठी उपलब्ध राहीलयाची खात्री देते. शाळेसोबत बिहारमधून येणाऱ्यामुलांचा अनुभवही जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातूनआलेल्या पर्यटका इतकाच समृद्ध असायला हवा. प्राचीनशिक्षण-केंद्रे आणि आध्यात्मिक चिंतनाची परंपराएकेकाळी संपूर्ण आशियातील लोकांना आकर्षितकरायची. विद्वानांचे आदान-प्रदान, संयुक्त प्रदर्शनेआणि शैक्षणिक प्रवासाच्या माध्यमातून आपण ते संबंधजिवंत करू शकतो. याच भूमिकेला मी नालंदा ॲप्रोच म्हटले. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) प्राचीन शिक्षण-केंद्रे, आध्यात्मिकचिंतनाची परंपरा संपूर्ण आशियातीललोकांना आकर्षित करायची. विद्वानांचेआदान-प्रदान, संयुक्त प्रदर्शने आणिशैक्षणिक प्रवासाच्या माध्यमातून आपणते संबंध पुन्हा जिवंत करू शकतो. याचभूमिकेला मी ‘नालंदा ॲप्रोच’ म्हटले.
