अमिताभ कांत यांचा कॉलम:दोन गोष्टींवर लक्ष हवे, निर्यात वाढवा, गुंतवणूकदारांना आकर्षित करणे
रुपयाचे मूल्य घसरत असताना भारताचे धोरणअर्थव्यवस्थेतील मूळ समस्या सोडवण्याऐवजीभांडवलाचा प्रवाह सांभाळण्यावरच केंद्रित राहिले आहे.पण फॉरेन करन्सी नॉन-रेसिडेंट डिपॉझिट(एफसीएनआर) सारख्या योजना तात्पुरता दिलासा देऊशकतात. यामुळे काही काळासाठी रोख रकमेचा प्रवाहनक्कीच तयार होईल. मात्र, याची किंमत रिझर्व्ह बँकेलामोजावी लागेल. यावर खरा उपाय म्हणजे थेट परदेशीगुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करणे आणि निर्यातवाढवणे हाच आहे. व्हिएतनाम आणि मेक्सिकोसारख्या देशांनी 2026 मध्येअब्जावधी डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षितकेली. भारतालाही हा परदेशी गुंतवणुकीचा ओघ टिकवूनठेवायचा असेल तर कायदेमंडळ, कार्यपालिका वन्यायव्यवस्थेच्या स्तरावर स्पष्ट नियम व अपेक्षित परिणामनिश्चित करावे लागतील. अलीकडेच आयडीबीआयबँकेतील भागभांडवल विक्रीला मिळालेल्या मंजुरीचेउदाहरण घ्या. वित्तीय क्षेत्रातील ही आपली सर्वात मोठीथेट परदेशी गुंतवणूक आहे. यामुळे बाजाराचा विश्वासदृढ झाला आहे. याचे श्रेय सरकारच्या निर्णयाला जाते.सर्वोच्च न्यायालयाने येस बँक, आरबीआय आणि केंद्रसरकारची याचिका फेटाळून लावली. एटी-1 बॉण्डचेमूल्य शून्य करण्याचा निर्णय रद्द करण्याचा आदेशन्यायालयाने कायम ठेवला. कारण बँक प्रशासकानेपुनर्रचना आराखड्याच्या अधिकारांच्या पलीकडे जाऊननिर्णय घेतला होता. ही घटना कर्ज आणि समभागांमध्ये(इक्विटी) गुंतवणूक करणाऱ्यांसह संपूर्ण वित्तीयव्यवस्थेसाठी अनिश्चितता निर्माण करते. एसएमबीसीबँकेने येस बँकेत मोठी रक्कम गुंतवली होती. दायचीआणि एनटीटी डोकोमो यांच्यानंतर जापानी गुंतवणूकप्रभावित होण्याची ही तिसरी वेळ आहे. टायगर ग्लोबलप्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिला.गुंतवणूकदारांकडे मॉरिशसचे टॅक्स-रेजिडेंसी प्रमाणपत्रअसूनही न्यायालयाने कर करारांतर्गत दिलासा देण्यासनकार दिला. हे प्रमाणपत्र कर चुकवेगिरीच्या चौकशीलारोखू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याआदेशामुळे कर करारांचा मूळ पायाच बदलून गेला आहे.अशाच प्रकारे एअरसेलचा पुनर्रचना आराखडा कर्जदातेआणि राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने मंजूर केलाहोता. स्पेक्ट्रम वापरण्याचे अधिकार हे संबंधित कंपनीच्याखात्यावर अमूर्त मालमत्ता (इनटँजिबल ॲसेट) म्हणूनगृहीत धरले गेले होते. तरीही स्पेक्ट्रमला दिवाळखोरीकायद्यांतर्गत होणाऱ्या कारवाईचा भाग बनवता येणारनाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 2025 मध्येहीसर्वोच्च न्यायालयाने जेएसडब्ल्यू स्टीलद्वारे झालेलाभूषण पॉवर अँड स्टीलचा ताबा रद्द केला होता, जरीशेवटी सप्टेंबरमध्ये पुनर्रचना आराखडा कायम ठेवण्यातआला. अशा निर्णयांमुळे थेट परदेशी गुंतवणूक(एफडीआय) आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीवर(एफपीआय) प्रतिकूल परिणाम होतो. सरकारच्या एकासंस्थेने ठरवलेली स्थिती दुसरी संस्था बदलू शकते, असासंदेश गुंतवणूकदारांमध्ये जातो. आपण नेहमीचन्यायालयीन व्यवस्थेत दावे प्रदीर्घ काळ प्रलंबितराहण्याबद्दल बोलतो. पण केंद्र-राज्य सरकारे आणिसार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) हे स्वतःचसर्वात मोठे पक्षकार आहेत, हेही वास्तव आहे. देशातविविध कर वादांमध्ये सुमारे 30 लाख कोटी रुपयेअडकले. हे समजून घ्यावे. अनिश्चिततेमुळे कंपन्याभारतात गुंतवणुकीचे मूल्यमापन करताना अपेक्षितपरताव्याचा दर वाढवून धरतात. गुंतवणूकदारांचा विश्वासपुन्हा संपादन करण्यासाठी व अपेक्षित थेट परदेशीगुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.यासाठी इलेक्ट्रॉनिक्स व डेटा सेंटर क्षेत्रातील 100 नवीनकंपन्यांना भारतात उत्पादनासाठी आणावे लागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
