राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:देशात पुन्हा पुन्हा समोर येतो "परकीय हस्तक्षेपाचा’ प्रश्न
सरसंघचालक मोहन भागवत आपले शब्द खूपतोलूनमापून वापरतात. त्यांच्या वक्तव्याला एक महत्त्वहीअसते. नुकतेच भागवत यांनी सरकारे पाडणाऱ्या एकाधोकादायक “जागतिक कारस्थानाविषयी’ भाष्य केलेहोते. फ्रान्स, अल्बानिया, बांगलादेश, नेपाळप्रमाणेभारतालाही लक्ष्य केले जाऊ शकते, असा संकेत होता. परंतु भारत म्हणजे फ्रान्स नाही, नेपाळ नाही आणिबांगलादेशही नाही. प्रत्येक समाजाची स्वतःची राजकीय परिस्थिती असते. त्याचे अंतर्गत तणाव व विरोधाची तत्कालीन कारणे वेगळी असतात. अशा वेळी एका देशातील आंदोलनांची प्रतिमा उचलून दुसऱ्या देशावर लादता येत नाहीत. किमान भारतासारख्या अथांग आणि विविधतेने नटलेल्या देशावर तर अजिबात नाही. त्यामुळे विविध देशांत होणारी आंदोलने हा एकाच परकीय कारस्थानाचा पुरावा आहे असे म्हणणे योग्य ठरणारनाही. तसे पाहिले तर”परकीय हात’ हा युक्तिवादभारतीय राजकारणासाठी नवीन नाही. देशातीलअस्वस्थ करणाऱ्या वास्तवाला तोंड देण्याऐवजीबाहेरील शक्तींवर दोष ढकलणे सोपे वाटते, अशासरकारांचा हा एक जुना व ओळखीचा मार्ग आहे. 1970च्या दशकातील इंदिरा गांधींचा कार्यकाळ आठवून पाहा.त्या वेळी जनआंदोलने व राजकीय विरोधाकडे बहुदापरकीय हस्तक्षेपाच्या चष्म्यातून पाहिले जायचे.सीआयएच्या कारस्थानाचा दाखला देऊन देशासमोरकशी आव्हाने उभी केली जात आहेत हे सांगितलेजायचे. यात विरोधाभास असा की, त्या काळातसंघाकडेही संशयाने पाहिले जायचे. लोक सरकारच्याविरोधात का जात आहेत असा प्रश्न विचारण्याऐवजी,परदेशात शत्रू शोधणे नेहमीच सोपे राहिलेले आहे. आता 2026 मध्ये परत येऊ. अवघ्या काही महिन्यांपूर्वीसरकारचे प्रतिनिधी पेपरफुटीच्या मुद्द्यावर कॉकरोचजनता पार्टीशी चर्चा करत होते. आज त्याच जेन-झीच्यानेतृत्वाखालील आंदोलनाकडे संशयास्पद परकीयकारस्थान म्हणून पाहिले जाते. नक्की काय बदलले?परकीय निधी मिळाल्याचा काही पुरावा समोर आलाका? की”परकीय हस्तक्षेपाचा’ हा सिद्धांत इतकासोयीचा आहे की त्यापासून स्वतःला वाचवणे कठीणजाते? अशीच शंका नियमितपणे राहुल गांधींच्याहालचालींवरही व्यक्त केली जाते. त्यांची एखादीवैयक्तिक परदेश भेटही अशा अप्रत्यक्ष आरोपांचीमालिका सुरू करते. हे इशारे कोणत्याही पुराव्याचीजबाबदारी न घेता कोणावरही आरोप करण्यासाठी खूपप्रभावी ठरतात. यामुळे विरोधी पक्षाचे राजकारणआपोआप संशयास्पद बनते. व्यवस्थेला आव्हानदेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला परकीय शक्तींचा एजंटम्हणून दाखवले जाऊ शकते. विरोधी पक्षाचे नेते,विद्यार्थी एखाद्या कारस्थानाचा भाग असतील, तर तेसिद्ध झाले पाहिजे. आपल्याकडे बलाढ्य तपास आणिगुप्तचर संस्था आहेत. देशाला अस्थिर करण्याचेनियोजनबद्ध प्रयत्न किंवा बेकायदा परकीय निधीचेविश्वसनीय पुरावे असतील, तर संस्थांनी नक्की तपासकरावा. कायद्यानुसार कारवाई करावी. पण असे पुरावेशेवटी आहेत कुठे? परकीय हस्तक्षेप नावाची गोष्टअस्तित्वातच नसते असे नाही. भारतासह अनेक देशांनाभूतकाळात खऱ्याखुऱ्या बाह्य दबावांना सामोरे जावेलागले आहे. परंतु प्रत्यक्ष परकीय षड्यंत्र ओळखणे,नागरिकांच्या रस्त्यावर उतरण्याला जागतिक कारस्थानठरवणे, या दोन गोष्टींत फरक आहे. बेरोजगारी,परीक्षांमधील गैरप्रकार, भ्रष्टाचार किंवा संस्थांचीस्वायत्तता कमकुवत होण्याच्या भीतीवर राग व्यक्तकरण्यासाठी जनतेला परदेशी पुरस्कर्त्यांची गरज नसते.तरुणांना स्वतःच्या भविष्याची काळजी वाटण्यासाठीपरदेशातून कोणाच्या निर्देशांची गरज नसते. तसेच तेबेकायदा ठरत नाही. सर्वात मोठा धोका असा आहे की,”परकीय हस्तक्षेपाच्या’ कथेचा वापर शांततापूर्णअसहमतीला बेकायदा ठरवण्यासाठी आणिदडपशाहीचे समर्थन करण्यासाठी केला जाऊ शकतो.लोकशाहीत बेकायदा कृत्य आणि वैध विरोध-निदर्शनेयातील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) “परकीय हस्तक्षेप” हा युक्तिवाद भारतीयराजकारणासाठी नवीन नाही. 1970 च्यादशकातील इंदिरा गांधींचा कार्यकाळआठवून पाहा. त्या वेळी जनआंदोलने वराजकीय विरोधाकडे बहुदा परकीयहस्तक्षेपाच्या चष्म्यातूनच पाहिले जायचे.
