नवनीत गुर्जर यांचा कॉलम:खोटारड्यांनी खोटारड्यांना सांगितलेय, खरे बोला!
फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड,पंजाब, गोवा व मणिपूर या पाच राज्यांत निवडणुकाआहेत. पुन्हा एकदा तीच निवडणुकीतील आश्वासने, त्याचघोषणा व आकर्षित करणाऱ्या डावपेचांची वेळ येणारआहे! खरे तर, निवडणुकीतील वचने वेळेच्यापायवाटेसारखी असतात. प्रचाराचा काळ संपल्यावरत्यावर इतके गवत उगवते की, त्या वचनांच्यापाऊलखुणाही शोधून सापडत नाहीत! सेवेसाठी नाही, तरकेवळ निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार आपल्यालाभुलवणारी आश्वासने देतात आणि आपण ती सहजमानूनही घेतो. नेत्यांना पाहताच आपल्या ओठांवर अनेक ‘किंतु’, ‘परंतु”येतात. पण आपण त्याचे प्रश्नांत रूपांतर करत नाही.आपण ते ओठांवरच पुसून टाकतो. जीभ तर फक्तसत्तेलाच असते. माणूस तर कधीपासून शांत आहे. हीगोष्ट तरुणांची आहे. त्यांना आजकाल ‘जेन-झी” म्हटले जाते. हे तरुण आजखूप लोकप्रियही आहेत.
कधी जंतर-मंतरमुळे, कधी रामलीला मैदानामुळे तरकधी स्वतःच्या अटकेमुळे. सरकारांना या जेन-झीच्याआंदोलनाचा किंवा त्यांच्या रागाचा काहीच तोडगासापडत नाहीये. तसेही वृद्धांनी भरलेल्या सरकारांनातरुणांचे प्रश्न समजणे जरा कठीणच जाते.
तरुण मात्र ऐकायला तयार नाहीत. हे अगदी बरोबर आहे. वयच असे असते की, आतापर्यंत पाहिलेले आणि अनुभवलेले सर्वकाही अजब वाटू लागते.
आसपासचे आणि दूरवरचे सर्वकाही अनोळखी वाटूलागते. समाज, सरकार आणि कुटुंबाची सर्व बंधनेपेटत्या चुलीत फेकून द्यावीशी वाटतात. आकाशातील तारे दुरूनच पाहायचे असतात. त्यांना आपण ‘सप्तर्षी” म्हणतो. त्यांच्याजवळ जाऊनत्यांना स्पर्श करावासा वाटतो. खरे तर, कोणत्याही तरुण मनाला संयम आणि समाधानाचे जिणे नको असते. तारुण्याचे सत्यच हे आहे की, त्याला समाधीची शांततानाही तर भटकंतीची अस्वस्थता मिळालेली असते! कपड्यांसारखे आसपासचे सर्वकाही तोकडे वाटू लागते. अशा वेळी आपण कोणत्याही व्यवस्थेचा किंवासरकारचा बुरसटलेला विचार का सहन करावा? आणितो कधीपर्यंत सहन करायचा? जगात कुठल्याही कोपऱ्यात अन्याय होताना पाहूनश्वासात आग पेटत नाही, तो तरुण कसला? आणि तेतारुण्य तरी कसले? तसे पाहता, सध्या काँग्रेस आणित्यांचे मित्रपक्ष जेन-झीच्या सर्व मुद्द्यांचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वातंत्र्यानंतर लगेच काँग्रेसने समाजवाद्यांचे सर्व नारेचोरले होते. ‘आम्ही विखुरलेला समाज एकत्र बांधत आहोत”, असे तेव्हा सांगितले गेले.
नंतर मात्र मतांसाठी त्याच जातींना पुन्हा विस्कळीत केलेगेले.
आज पुन्हा तसेच घडताना दिसत आहे. राहुल गांधींनावाटत आहे की, ते जेन-झीचे नेते म्हणून पुढे येत आहेत.
काँग्रेसला वाटतेय की, जेन झीच्या आधारे आपली नावपार करण्याची हीच योग्य संधी आहे.
कदाचित असे होईलही. पण दिल्ली अजून खूप दूर आहे,म्हणजेच लोकसभा निवडणुकीला अजून खूप वेळ आहे!
पाच राज्यांत आता निवडणुका होणार आहेत. तिथेजेन-झीचा प्रभाव चालला, तर सत्ता उलटायला वेळलागणार नाही.
पण आंदोलन करणारे आणि घरात बसून त्यांना पाठिंबादेणारे तरुण प्रत्यक्षात किती मतदान करतात? त्यातीलकिती जण पोलिंग बूथपर्यंत पोहोचतात? हा वेगळा प्रश्नआहे.
असे असले तरी, आग दोन्ही बाजूंनी सारखीच लागलेलीआहे!
काँग्रेस मतांच्या चोरीचा आरोप करून लोकांना आपल्याबाजूने करू इच्छिते. तर दुसरीकडे, पहिल्यांदाच सत्ताधारीपक्ष किंवा बहुतांश राज्य सरकारे आणि केंद्र सरकारहीदेशात विरोधी पक्षाविरोधात रस्त्यावर उतरायला तयारआहेत. ते आंदोलन करतही आहेत!
सामान्य माणसासाठी सत्ताधारी आणि विरोधकयांच्यातील हे विरोध-निदर्शने म्हणजे एक तमाशाच आहे.
अशा वेळी प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांची आठवणयेते… :
‘झूठों ने झूठों से कहा है,
सच बोलो…
सरकारी ऐलान हुआ है,
सच बोलो…!
घर के अंदर झूठों की एक मंडी है,
दरवाजे पर लिखा हुआ है,
सच बोलो…!’ आश्वासने, घोषणांची वेळ…पुन्हा निवडणुकीतील तीच आश्वासने,त्याच घोषणा व आकर्षित करणाऱ्याडावपेचांची वेळ येईल. निवडणुकीतीलआश्वासने ही जणू वेळेच्यापायवाटेसारखी असतात. प्रचार झाल्यावरत्यावर इतके गवत उगवते. त्यातआश्वासनांच्या पाऊलखुणाही दिसतनाहीत! सेवेसाठी नव्हे तर फक्त निवडणूकजिंकण्यासाठी उमेदवार आश्वासने देतातव आपणही ती खरी मानतो.
