पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:योग आणि विज्ञानाचे संयुक्त जीवन जगणे हीच बुद्धिमत्ता
महाभारतात अर्जुनाने रथाची सूत्रे श्रीकृष्ण यांच्या हाती दिली. त्यामुळेअर्जुन सुरक्षित राहिले आणि त्यांना विजयही मिळाला. अर्जुन भाग्यवानहोते. कारण त्यांना ईश्वर प्रत्यक्ष दिसत होते. आपल्याला ईश्वर दिसणारनाहीत. तरीही आयुष्याचे स्टिअरिंग ईश्वराच्याच हातात आहे. काहीदिवसांपूर्वी परदेश दौऱ्यावर असताना मला ‘टेस्ला”च्या ड्रायव्हरशिवायचालणाऱ्या गाडीत बसण्याचा अनुभव मिळाला. तेव्हा मला अर्जुनाचीआठवण झाली. गाडी कोण चालवत आहे हे दिसत नव्हते. तो अनुभवखूप सोयीचा आणि तितकाच रोमांचक होता. मनात एक अज्ञात भीतीहीहोती. पण मी निघालो आणि सुरक्षितपणे परत आलो. मला तंत्रज्ञानाचाआदर करायचा होता. पण तिथे मी अध्यात्माच्या दृष्टीने विचार करतहोतो. हेच आयुष्याचे खरे सत्य आहे. जीवनाची गाडी चालवणाराचालक आपल्याला दिसत नाही, पण तो नक्की आहे. हीच ईश्वराचीजाणीव आहे. आता तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मानवी शरीरावर अनेकप्रयोग होत आहेत. शरीरात शांततेने जगायचे असल्यास आत्म्याचीजाणीव करून घ्यावीच लागेल. त्याचा उत्तम मार्ग योग आहे. योग आणिविज्ञानाचे संयुक्त जीवन जगणे हीच खरी बुद्धिमत्ता ठरेल.
