पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:धर्म योग्य अर्थाने समजून तो जीवनात उतरवणे गरजेचे
सध्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात राजकारणच दिसते. नैतिकता जणूकुठेतरी संपूनच गेली आहे. राजकारणाने धर्मात प्रवेश करून सर्वातजास्त नुकसान केले आहे. धर्माच्या राजकारणात तीन प्रकारचे लोकआले. एक होते पुरोगामी. त्यांनी धर्माचा थोडाफार सदुपयोग केला, पणआपल्या स्वार्थासाठी अतिशय सावधगिरीने त्याचा दुरुपयोगही केला.दुसरे होते परंपरावादी. त्यांनी अनेक चांगल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वकडोळेझाक केली. त्यामुळे धर्माचे नुकसान झाले. नंतर राजकारणीमंडळींनी तर कोणतीही कसर सोडलीच नाही. म्हणूनच आजच्या तरुणमुलांमध्ये धर्माबद्दल उदासीनता आली आहे. जे खरे साधू-संत होते, तेतटस्थ राहिले. हळूहळू हे राजकारण वाढत गेले. घराघरात पोहोचले.पती-पत्नी एकमेकांशी राजकारण करतात, हे समजू शकते, कारण यानात्यात सर्वाधिक अपेक्षा असतात. पण आता आई-वडील आणिमुलांमध्येही राजकारण सुरू आहे. आपला स्वार्थ साधा आणिसमोरच्याला बाजूला करा. राजकारणाची अशी परिस्थिती कुटुंबासाठीअत्यंत घातक आहे. या सर्वांवर एकच मार्ग आहे – धर्म योग्य अर्थानेसमजून घ्यावा आणि तो जीवनात उतरावा.
