पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:हे सहा शुभ गुण असतील तर दुःखे त्रास देऊ शकणार नाहीत
माणूस होण्यासाठी केवळ कर्म करून चालत नाही, तर निर्मितीकरावी लागते. तुम्ही शरीरापासून आत्म्यापर्यंतचा प्रवास केला नाही,तर तुम्ही माणूसही होऊ शकणार नाही. श्रीरामांनी काकभुशुंडींना सहासूत्रे सांगितली होती. ही सूत्रे आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी उपयुक्तठरतात. श्रीराम म्हणाले होते: भगति ग्यान विज्ञान बिरागा, जोग चरित्ररहस्य बिभागा। जानब ते सबही कर भेदा, मम प्रसाद नहिं साधन खेदा।याचा अर्थ असा की भक्ती, ज्ञान, विज्ञान, वैराग्य, योग, माझ्या लीला,त्यांचे रहस्य, विभाग- या सर्वांमधील भेद तू माझ्या कृपेने सहज जाणूनघेशील. साधनेचे कष्ट सहन करावे लागणार नाहीत. येथे श्रीरामांनी सहागोष्टी सांगितल्या आहेत. हे सर्व शुभ गुण आहेत. ईश्वराच्या कृपेने तेमाणसाला प्राप्त होतात. श्रीरामांनी साधनेचे कष्ट होणार नाहीत, असेसांगितले. ऐहिक गोष्टींचाही त्रास होतोच. हे सहा शुभ गुण असल्यासआपण या जगात राहू. सर्व आनंदांचा उपभोगही घेऊ. जगातील दुःखेदेणार नाहीत.
