आज नवरात्रीचा दुसरा दिवस:तपस्येमुळे माता पार्वतीला ब्रह्मचारिणी हे नाव मिळाले, जाणून घ्या देवीची कथा आणि पूजाविधी
आज (12 ऑक्टोबर) शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, देवीच्या या स्वरूपाची पूजा केल्याने सर्व कामे पूर्ण होतात, अडथळे दूर होतात आणि यश मिळते. देवी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयम यांसारख्या भावना जागृत होतात. असे आहे देवी ब्रह्मचारिणीचे स्वरूप देवी पार्वतीने शिवजींना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले होते. ब्रह्म शब्दाचा अर्थ तपस्या असा आहे आणि ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी देवी. कठोर तपामुळे देवीला ब्रह्मचारिणी हे नाव मिळाले. ब्रह्मचारिणी स्वतः पांढऱ्या वस्त्रांमध्ये दर्शन देतात, म्हणून भक्तांनीही त्यांच्या पूजेसाठी पांढरे कपडे परिधान करावेत.
