पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुणाचेही ऐकायचे असेल, तर संयमाने आणि शांततेने ऐका
श्वान वगळता दुसरा कोणताही प्राणी माणसासाठी माणसाचा पर्यायबनू शकला नाही. बाकीचे प्राणी माणसाने स्वतःच्या उपयोगासाठी जवळकेले. पण श्वान असा प्राणी आहे, ज्याच्या माध्यमातून माणसानेमाणसाचीच उणीव भरून काढली. कारण, प्रत्येकाला वाटते कीकुणीतरी आपल्यासमोर शेपूट हलवावी, आपले ऐकावे. तो आपलारक्षकही असावा व सेवकही असावा. या कामात हा प्राणी खूप तरबेज आहे. आपल्यासमोर कुणीतरी शेपूट हलवावी, हे कुणाला आवडणारनाही? आता हेच मानसशास्त्र समजून घ्या. याद्वारे तुम्हीही कुणाचे तरीलाडके आणि आवडते बनू शकता. तुम्ही कुणासमोर शेपूट हलवू नका,कुणाची खुशामत करू नका. पण कुणाचे काही ऐकून घ्यायचे असेल,तेव्हा संयम व शांततेने ऐका. योग्य वेळ पाहून प्रतिक्रिया द्या. डोळ्यांतूनहास्य व्यक्त करून समोरच्याला त्याचे महत्त्व पटवून द्या. तुमचा वेळेचाताळमेळ इतका अचूक असावा की समोरची व्यक्ती प्रोत्साहित होईल.श्वान आपल्याला मोठी गोष्ट शिकवतो- ती म्हणजे, दुसऱ्यांच्या पसंतीसकसे उतरावे.
