October 15, 2026

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:भक्तीत ताजेपणा, जागरूकता, सतर्कता आणि समर्पण मागा

0
pt-vijayshanker_1790620095.jpg

भक्तांच्या विश्वात एक चर्चा नेहमी होते. देवाकडे काही मागावे की मागू नये? एक वर्ग म्हणतो, देवाला सर्वकाही माहिती आहे. मग कशाला मागायचे? काही लोक म्हणतात, देव परमपिता आहे. मग आई-वडिलांकडे मागण्यात अडचण काय? तुलसीदासजींनी एक प्रसंग सांगितला. काकभुशुंडीजींनी गरुडजींना म्हटले —‘मन भावत बर मागउं स्वामी, तुम्ह उदार उर अंतरजामी.’ अर्थात- हे स्वामी! मी माझ्या मनासारखा वर मागत आहे. उदार आहात. हृदयास जाणणारे आहात. आता या एकाच चौपाईत पहिले विधान दुसऱ्या विधानाला छेद देते. अर्ध्या ओळीत म्हटले की, मी मागत आहे. तर उर्वरित ओळीत म्हटले की, आपण अंतर्यामी आहात. यात देव भक्ताच्या मनातील सर्व काही ओळखतो. त्यामुळे ईश्वराकडे भौतिक वस्तू मागू नका. देवाला सांगा, भक्तीत ताजेपणा द्या. जागरूकता, सतर्कता व समर्पण द्या.बाकी वस्तू कमावू शकतो. गमावूही शकतो. पण देण्याचीच इच्छा असल्यास या गोष्टी नक्की द्या. वाईट गुणांपासून वाचण्यासाठी हरणासारखे सतर्क बनवा

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!