Keep Your Devotion Secret & Avoid Public Display
- Marathi News
- Opinion
- Keep Your Devotion Secret & Avoid Public Display | Pandit Vijay Shankar Mehta
7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

मोठमोठ्या लोकांचे सुख कधी उडून जाईल आणि कोमेजून जाईल, हेसांगता येत नाही. कितीही मोठा सद्गुणी माणूस असला, तरी त्याच्यागुणांवर दुर्गुणांचा हल्ला होतोच. तुलसीदासजींनी एका ओळीत याच्यारक्षणाचा उपाय सांगितला आहे. तुम्हाला तुमचे सुख आणि गुण टिकवूनठेवायचे असतील, तर त्यांना भक्तीशी जोडलेले ठेवा.
ते लिहितात-‘भगति हीन गुन सब सुख ऐसे, लवन बिना बहु बिंजन जैसे.’भक्तीशिवाय सर्व गुण आणि सर्व सुख अगदी तसेच अळणी असतात.मीठाशिवाय अनेक प्रकारचे चविष्ट अन्नपदार्थ! जेवणात मीठ व साखरदिसत नाहीत, पण खरी चव त्यांच्यामुळेच येते.
आपण आयुष्यातील गुणव सुखांना भक्तीशी अशाच प्रकारे जोडायला हवे. भक्तीमध्ये प्रदर्शनयेताच तिचे रूपांतर कर्मकांडात होते. पुढे हे कर्मकांड केवळ सवय बनूनराहते. म्हणूनच आपली भक्ती नेहमी गुपित ठेवा. तिचे खूप प्रदर्शन करूनका. देवाने तुम्हाला गुण आणि सुख दिले असेल, तर त्यातील 10%भाग इतरांसाठी खर्च करा. तेव्हा कुठे गुण आणि सुखाला खरी चवयेईल.
