October 15, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:तुम्ही स्वतःसाठी पुरेशी तयारी केली आहे का?

0
zh5tc6_1789241545.jpg

चीनमधील व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म ‘बिलिबिली’वर सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे. गमतीशीर व गंभीर शैलीतील या व्हिडिओचा विषय आहे, बेघर झाल्यावर उदरनिर्वाह कसा करावा? काही दिवसांतच तो 60 लाख वेळा पाहिला गेला आहे. यामध्ये तरुणांना अशा युक्त्या शिकवल्या आहेत की ते कचऱ्याच्या डब्याजवळ झोपून गरजेच्या वस्तू कशा शोधू शकतात. सीसीटीव्हीपासून वाचण्यासाठी पुठ्ठे रणनीतिक पद्धतीने कसे लावायचे. चिनी तरुण याला वर्ष 2026 च्या अर्थव्यवस्थेत प्रवेश करणाऱ्या नवीन पदवीधरांसाठी अनिवार्य ‘यूथ स्टडी’ कोर्स म्हणत टोला लगावत आहेत. पण चीनमध्ये आता रेडनोट, डॉउइन व वीबोसारख्या प्लॅटफॉर्मवर स्कँडल किंवा आपत्तीपेक्षा आर्थिक निराशेचे व्हिडिओ पाहणे हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. अखेर हे सर्व कशाकडे निर्देश करत आहे? तरुण पिढी आर्थिक स्थैर्याबाबत चिंतित आहे का? जर होय, तर आमचा सल्ला आहे- ‘बेघर होणे किंवा आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करा.’ 1. सर्व्हायव्हल फंड बनवा: सुरुवातीच्या कमाईचा अर्थ सुट्ट्या घालवणे, महागडे गॅजेट्स घेणे किंवा ट्रेडिंगमध्ये पैसे ओतणे असा नाही. हे पैसे आणीबाणीसाठी वाचवून ठेवले पाहिजेत.
2. कमाईचे दुसरे मार्ग उघडा: तो जुना काळ होता जेव्हा म्हटले जायचे- ‘चांगली नोकरी मिळवा.’ पण नवा काळ सांगतो की आपले कौशल्य सतत अपडेट करत राहा, कारण एआय, ऑटोमेशन व आर्थिक चक्र कधी कोणत्या नोकरीला संपवेल, हे सांगता येत नाही. जो शिकवू शकतो, डेटा विश्लेषण, डिझाइन, कोडिंगसारखे विशेष कौशल्य ठेवतो, त्याच्याकडे मुख्य उत्पन्न हिरावले गेल्यासही अनेक पर्याय असतात.
3. ‘बॅड-इयर प्लॅन’ तयार ठेवा: प्रत्येक तरुणाला हे माहिती पाहिजे की नोकरी गेल्यास कामाशिवाय तो किती महिने तग धरू शकतो. आवश्यक खर्च, रोख व मालमत्तेचा हिशेब ठेवा जे गरज पडल्यास पैशात रूपांतर करता येईल.
4. बचत मोठी ताकद देते: जर तुम्ही बचतीच्या आधारे पगाराशिवाय 6 महिने तग धरू शकत असाल, तर तुम्ही वाईट वातावरणातील नोकरी सोडून सहज बाहेर पडू शकता. जर खिसा रिकामा असेल, ईएमआयचे ओझे असेल, तर तुम्ही बाहेर पडू शकत नाही. मॅनेजमेंट टिप: पर्सनल फायनान्सचा खरा उद्देश हाच आहे की, एखादे वर्ष वाईट गेले तरी तुमची आर्थिक स्थिती पत्त्यांसारखी कोसळू नये.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!