पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तरुण वयात चारित्र्य समजून घ्या, आपल्या तेजाचा वापर करा
आजकाल विशेषतः नवी पिढी प्रचंड परिश्रम करत आहे. पण आतापरिश्रमासोबतच शिक्षण, योग्यता व संस्कारांचे तेजही त्यात मिसळावेलागेल. कारण आपण संस्कार स्वीकारतो, तेव्हाच आपल्याचारित्र्यावर ठाम राहू शकतो. मनातून तेज प्रकट होते, ते चारित्र्यातूनयेते; बाह्य व्यक्तिमत्त्वातून नाही. आपल्यामध्ये सूर्यासारखे तेज आहे,फक्त ते प्रकट करण्याची गरज आहे. तुलसीदासजींनी लिहिले आहे-‘राकापति षोडस उअहिं तारागन समुदाइ, सकल गिरिन्ह दव लाइअबिनु रबि राति न जाइ।’ म्हणजेच, सर्व तारांगणांसोबत 16 कलांनीपरिपूर्ण असा चंद्र उगवला आणि सर्व पर्वतांवर वणवा पेटला, तरीहीसूर्याचा उदय झाल्याशिवाय रात्र संपू शकत नाही. विशेषतः तरुण वयातचारित्र्याचे महत्त्व समजून घ्या आणि आपल्या तेजाचा योग्य वापरकरा. वय निघून जात असते. कोणताही काळ इतका सुंदर नसतो की तोआयुष्यभर थांबून राहील. म्हणूनच बालपणापासूनच मुलांनासूर्यनमस्काराशी जोडा. सूर्याला अर्घ्य देण्याच्या परंपरेचे वैज्ञानिकमहत्त्व समजावून सांगा.
