Connect With Divine Leela To Overcome Maya
- Marathi News
- Opinion
- Pandit Vijayshankar Mehta Column: Connect With Divine Leela To Overcome Maya
21 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

पूजा-पाठ करणारे लोकसुद्धा अनेकदा भ्रमात पडतात. ”आमच्याचबाबतीत असे का घडते? ईश्वर खरोखर आहे का? असेल तर तोआमचे का ऐकत नाही?” अशा तक्रारी ते करतात. यावर संततुलसीदासजी लिहितात— ”परबस जीव स्वबस भगवंता, जीव अनेकएक श्रीकंता.” म्हणजेच माणूस परतंत्र आहे आणि भगवान पूर्णपणेस्वतंत्र आहेत. जीव अनेक आहेत, पण सर्वांचा स्वामी एकच आहे.
तुलसीदासजी स्पष्ट सांगतात की, ही माया भ्रम निर्माण करते. यामायेपासून वाचण्यासाठी भजन करावे. भजन करताच आपण देवाजवळजातो किंवा देव आपल्याजवळ येतो. भागवत पुराणात कृष्णानेरासलीला केली, तेव्हा लोक भ्रमात पडले. कृष्ण आणि गोपिकांच्यारूपात लोक स्त्री-पुरुष शोधू लागले. हीच ती माया! पण मनापासून भजनकेले तर ही माया दूर होते. ”कृष्ण” या शब्दाचा अर्थच आकर्षित करणाराआणि भक्ताला स्वतःत सामावून घेणारा असा आहे. म्हणूनच,आयुष्यात जेव्हा माया सतावेल, तेव्हा ईश्वरलीलेत लीन व्हा.
