August 31, 2026

कोल्हापूर शहरांमध्ये भाजप व काँग्रेस कडून फुटबॉल शौकिनांसाठी फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी मोफत एलईडी स्क्रीनची व्यवस्था.

0
IMG-20260719-WA0152
  • कोल्हापूर | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
    फुटबॉल विश्वचषक 2026 च्या पोर्तुगाल विरुद्ध स्पेन या दोन देशोंमधील फिफा वर्ल्ड कप च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, फुटबॉलप्रेमींसाठी कोल्हापुरात दोन प्रमुख राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे मोठ्या एलईडी स्क्रीनवर सामन्याचे मोफत थेट प्रक्षेपण आयोजित केले आहे. अंतिम सामना रविवारी, 19 जुलै रोजी होणार असून संपूर्ण राज्यात फुटबॉलचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनानेही या निमित्ताने होटल्स व उपाहारगृहे पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास विशेष परवानगी दिली आहे.
    भाजपकडून मोठ्या स्क्रीनवर प्रक्षेपण
    भारतीय जनता युवा मोर्चा, कोल्हापूरच्या वतीने मंगळवार पेठ येथील मिरजकर टिकटी येथे मोठ्या एलईडी स्क्रीनवर अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
    वेळ: रविवार, 19 जुलै रात्री 10.30 वाजल्यापासून
    स्थळ: मिरजकर टिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर
    सर्व फुटबॉलप्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    काँग्रेसकडूनही स्वतंत्र आयोजन
    दुसरीकडे, कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने स्टेशन रोडवरील सुरज हॉल येथे मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले आहे.
    वेळ: रविवार, 19 जुलै रात्री 11.30 वाजल्यापासून
    स्थळ: काँग्रेस कमिटी हॉल, स्टेशन रोड, कोल्हापूर
    फुटबॉलप्रेमी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या संचालकांनी केलेले आहे.
    फुटबॉलच्या उत्साहात कोल्हापूर नेहमीच आघाडीवर असते.
    फुटबॉलप्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात यंदाही विश्वचषक अंतिम सामन्याबाबत मोठा उत्साह आहे. शहरातील विविध भागांत फुटबॉलप्रेमींकडून सजावट, ध्वज आणि सामन्याविषयी चर्चा सुरू असून अंतिम सामन्याचा जललोष रंगाार आहे.
    दोन्ही ठिकाणी प्रवेश पूर्णपणे मोफत असून फुटबॉलप्रेमींनी आपल्या सोयीनुसार संबंधित ठिकाणी उपस्थित राहून विश्वचषक अंतिम सामन्याचा रोमांच मोठ्या स्क्रीनवर अनुभवण्याचे आवाहन संचालकांनी केले आहे.
    जेमहाराष्ट्र न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!