पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:भक्ती करत राहा; ईश्वराला प्रार्थना आवडते, प्रदर्शन नाही
कबीर शेवटच्या काळात कुठे गेले, हे रहस्य फुलांमध्येच दडून राहिले.मीराबाई कुठे अंतर्धान पावल्या, हे कोणतीही मूर्ती सांगू शकत नाही.भक्त ईश्वरात कसा विलीन होतो, याची अनेक उदाहरणे आपल्यापरंपरेत आहेत. भक्तीसाठी तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे हे पहिले पाऊल ठरूशकतात. त्यानंतरचा मार्ग मात्र तुमचा स्वतःचा असतो. आयुष्यभरतुम्ही कोणत्याही मंदिरात गेला नाहीत. तरीही भक्ती परिपक्व होऊशकते. आताची नवी पिढी भक्ती वेगळ्या पद्धतीने करताना दिसेल.गेल्या 50 वर्षांत अमेरिकेत चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या 20 टक्क्यांनी घटली. याउलट भारतात जुन्या मंदिरांना नवे स्वरूप दिलेजात आहे. भव्य कॉरिडॉर होत आहेत. त्यात सोहळ्याची भव्यता वभक्तांची गर्दी अधिक ठळकपणे दिसते. परंतु भक्ती शोधून सापडतनाही. मंदिरे जपली जात आहेत. ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. मात्रती केवळ पर्यटन, मनोरंजन किंवा निवडणुकीच्या राजकारणाची केंद्रेबनू नयेत. कबीर व मीराबाई यांनी शिकवले आहे -ईश्वराला प्रार्थना प्रियअसते; प्रदर्शन नव्हे.
