Importance Diminished, Says Syed Ata Hasnain
- Marathi News
- Opinion
- Territorial Control In Warfare: Importance Diminished, Says Syed Ata Hasnain
22 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

युद्धांचे स्वरूप बदलत आहे. भूभागावरील नियंत्रणआजही महत्त्वाचे आहे, मात्र एखाद्या प्रदेशावर दीर्घकाळकब्जा ठेवण्यापेक्षा आपली पोहोच, दबाव आणि प्रभावयांच्या माध्यमातून अपेक्षित रणनीतिक उद्दिष्टे साध्यकरण्याला देश अधिक प्राधान्य देत आहेत. इतिहासातमात्र लष्करी विजयाचा थेट अर्थ संबंधित भूभागावर ताबामिळवणे असा होता. सैन्ये प्रदेश जिंकत, राजधानींवरनियंत्रण मिळवत आणि त्याद्वारे राजकीय परिणामथोपवत. रोमन साम्राज्याच्या संघर्षांपासून ते जागतिकमहायुद्धांपर्यंत भूभाग हेच लक्ष्य, विजयाचे प्रमुखमोजमाप होते. यामागील तर्कही सरळ होता—एखाद्याराष्ट्रावर किंवा जनतेवर वर्चस्व प्रस्थापित करायचेअसेल तर त्याची भूमी, संसाधने आणि संस्थांवरनियंत्रण आवश्यक असते. भौगोलिक अंतर ही एक रणनीतिक अडचण मानली जात होती, कारण अंतरवाढले की लष्करी शक्तीचा प्रभाव कमी होत जात असे.
मात्र आजच्या संघर्षांमध्ये अनेक देश भूभागावर प्रत्यक्षताबा न मिळवता रणनीतिक उद्दिष्टे साध्य करण्याचाप्रयत्न करत आहेत. लांब पल्ल्याचे अचूक हल्ले, ड्रोन, सायबर कारवाया, आर्थिक दबाव, माहितीविषयकमोहिमा यांच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यावर प्रभावटाकण्याचा प्रयत्न होतो . दीर्घकालीन वर्चस्वाच्याजबाबदाऱ्यांना झटकता येते . उद्दिष्टे तीच असली तरी तीसाध्य करण्याच्या पद्धती बदलल्या. यामागे भूभागावरकब्जा टिकवण्याच्या आर्थिक फायद्या-तोट्यांचाहीविचार आहे. अफगाणिस्तानातील सोव्हिएत संघाचाअनुभव तसेच इराक, अफगाणिस्तानातील अमेरिकेचाअनुभव हे दाखवून देतात की, लष्करी वर्चस्व आपोआपटिकाऊ राजकीय नियंत्रणात रूपांतरित होत नाही.आधुनिक सैन्ये एखादा प्रदेश वेगाने ताब्यात घेऊशकतात, परंतु तीव्र प्रतिकाराच्या परिस्थितीत त्या भागाचेप्रशासन चालवणे अधिक कठीण ठरते.
आज एखाद्या प्रदेशावर कब्जा मिळवणे म्हणजेआंतरराष्ट्रीय देखरेख, सातत्यपूर्ण प्रसारमाध्यमांचे लक्षव दीर्घकालीन प्रतिकार यांना आमंत्रण देणे होय. त्याचीआर्थिक व राजकीय किंमत मोठी असते. त्यामुळेलष्करी यश हे एखाद्या मोहिमेचा शेवट न ठरता मोठ्यारणनीतिक ओझ्याची सुरुवात ठरू शकते. एकविसाव्याशतकातील संघर्षांनी वारंवार दाखवून दिले आहे की,एखादा भूभाग ताब्यात घेणे आणि त्यातून अपेक्षितपरिणामांवर नियंत्रण ठेवणे या आता वेगळ्या गोष्टीबनल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे दूरवरच्या प्रदेशांपर्यंत प्रभावटाकण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. अचूकलक्ष्यभेदी शस्त्रास्त्रे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, ड्रोन,सायबर क्षमता, उपग्रह निरीक्षण व्यवस्था आणि कृत्रिमबुद्धिमत्ता यांच्या मदतीने देशांना अशा संधी उपलब्धझाल्या की, आपल्या सीमांपासून हजारो किलोमीटर दूरमोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात न करताही ते घटनांवरप्रभाव टाकू शकतात.
युक्रेनमधील युद्ध अचूक व तीव्र हल्ल्यांचे महत्त्वअधोरेखित करते. दोन्ही बाजू आघाडीपासून शेकडोकिलोमीटर दूर असलेल्या लष्करी, औद्योगिक आणिऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत.रणांगणावरील कौशल्याचे प्रदर्शन करण्यापेक्षा तेआपल्या दूरवर पोहोचण्याच्या क्षमतेद्वारे रणनीतिकपरिणाम साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.इस्रायल-इराण संघर्षातही तीव्र लष्करी चकमकीअसूनही कोणताही पक्ष प्रत्यक्ष भूभाग ताब्यात घेण्याचाप्रयत्न करताना दिसलेला नाही. हा संघर्ष प्रतिरोधकक्षमता, रणनीतिक प्रभाव निर्माण करणे आणि दूरवरूनहानी पोहोचवण्याच्या क्षमतेभोवती फिरताना दिसतो.परदेशी भूभागावर सैन्य तैनात करणे आणि ते दीर्घकाळटिकवून ठेवणे हा युद्धाचा अत्यंत खर्चिक,राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि लष्करीदृष्ट्याधोकादायक प्रकार ठरला आहे. अशा मोहिमांसाठीमोठ्या प्रमाणात रसद व्यवस्था आणि दीर्घकालीनराजकीय बांधिलकी आवश्यक असते. तुलनेने लहानआणि कमकुवत प्रतिस्पर्ध्यांनाही ही वस्तुस्थिती माहीतअसते.प्रतिस्पर्ध्याच्या हालचाली अधिक प्रभावीपणे पाहू,ऐकू आणि समजू शकतो, तो पक्ष मोठ्या प्रमाणावरसैनिकांचे जीव धोक्यात न घालता महत्त्वाची आघाडीमिळवू शकतो. गुप्तचर माहिती, देखरेख व्यवस्था वअचूक लक्ष्यभेदी हल्ले ही साधने आता अनेक बाबतीतजमिनीवरील प्रत्यक्ष लष्करी उपस्थितीइतकीच प्रभावीठरत आहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
आज एखाद्या प्रदेशावर ताबामिळवण्याचा अर्थ म्हणजे सततचीदेखरेख आणि दीर्घकालीन प्रतिकारालासामोरे जाणे. त्याची किंमत खूप मोठीअसते. अशा परिस्थितीत लष्करी यश हेमोहिमेचा शेवट नसून मोठ्या रणनीतिकओझ्याची सुरुवात ठरू शकते.

