Cambridge Dictionary Names Human Word Of The Year 2026
21 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

आज आपण अशा काळात जगत आहोत, जिथेमाणूस आणि मशीन यांच्यातील अंतर मिटत चाललेआहे. मशीनच्या तुलनेत माणसाची उंची कमी होत आहे.पण त्याच वेळी आपले सर्व शब्द घेऊन एक डिक्शनरीसमोर येते आणि जाहीर करते की, या जगाला पुन्हाएकदा त्या माणसाकडे पाहण्याची गरज आहे. त्याचमाणसाने मशीन बनवले, एआयची निर्मिती केली आणिह्यूमनॉइड रोबोटला ‘केअर’च्या कोमल हावभावांचाअल्गोरिदमही दिला. मात्र, या सगळ्यात तो माणूसच मागेपडला, ही वेगळी गोष्ट.
पण केंब्रिज डिक्शनरीने त्याला मागे पडू दिले नाही. तिने2026 चा ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून ‘ह्यूमन’ म्हणजेचमाणूस या शब्दाची निवड केली आहे. हा एक खोलआणि अत्यंत अर्थपूर्ण संदेश आहे. केंब्रिजच्या मते,‘ह्यूमन’ या विशेषणाचा अर्थ असा आहे- ‘असे गुण,उणिवा आणि भावना, ज्या केवळ माणसांमध्ये असतात;देव, प्राणी किंवा मशीनमध्ये नाही.’
वर्षाचा शब्द म्हणून ‘ह्यूमन’ची निवड होणे, हेमाणसाला वाचवण्याचे एक आवाहनही वाटते.आजकाल हा शब्द अनेकदा जोडशब्दांमध्ये दिसतो. जसेकी, माणसाने लिहिलेले, माणसाने बनवलेले, माणसानेतयार केलेले, माणसाने मंजूर केलेले इत्यादी. असे घडतआहे, कारण एखादी भावना किंवा प्रयत्न निव्वळमानवीच आहे, हे आता आपण सहजासहजी स्वीकारूशकत नाही. त्यामुळे ‘ह्यूमन’ शब्दाची निवड एकासामाजिक आणि नैतिक अस्वस्थतेचेही दर्शन घडवते.आपण माणूस आहोत, हे आपल्याला वारंवार आणिजवळपास जोर देऊन का सांगावे लागत आहे? पूर्वी तरअशी गरज कधीच भासली नव्हती.
हा बदल केवळ अल्गोरिदमपुरता मर्यादित नाही, तर तोएका व्यावहारिक बदलाचेही प्रतीक आहे. कारणआजकाल घरांमध्येही सदस्यांना ती मानवी भावनावारंवार सांगावी आणि दाखवावी लागत आहे. इतकेचकाय, तर ऑफिसमध्ये कुणी जास्त ‘ह्यूमन’ दिसले किंवाबोलण्यात भावुकता असली, तरी आश्चर्य वाटते. तरीही,आपला बॉस मशीनसारखा कमी आणि माणसासारखाजास्त असावा, अशीच प्रत्येकाची इच्छा असते. आजचाकाळ डेटा, निकाल आणि बाजारकेंद्रित आहे. अशाकाळात माणूस बनून राहणे ‘रिस्की’ झाले आहे. पण हेहीतितकेच खरे आहे की, आपल्या आचरणात आणिव्यवहारात ते मानवी गुरुत्वच महत्त्वाचे असते. जेव्हाएखादे काम यांत्रिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर केलेजाऊ शकते, तेव्हा ‘माणूस’ हा शब्द त्या कामाचा मूळस्रोत, जबाबदारी आणि त्याच्या खऱ्या मूल्याची ओळखबनतो. आज काहीही लिहिले, वाचले, बोलले जावो किंवाकुणाची काळजी घेतली जावो; यामागे खरोखरच कुणीमाणूस आहे का, हा प्रश्न आता अचानक महत्त्वाचा ठरलाआहे.
या शब्दाच्या निवडीमागील नैतिक प्रश्न आधीपासूनचअत्यंत स्पष्ट आहेत. रोबोट एका रात्रीत अचानक संपूर्णजगावर ताबा मिळवतील, हा खरा धोका नाही. खरा धोकात्या मानवी सवयी आणि जीवनपद्धती हळूहळू नष्टहोण्याचा आहे. यामध्ये कुणाची तरी काळजी घेणे, हरणेआणि ती हार स्वीकारणे, जिंकल्यावर उगीच गाजावाजान करणे, एम्पथी आणि विश्वासासाठी जगणे, सुख-दुःखअनुभवणे, गर्व आणि मत्सरापासून दूर राहणे, स्वतःवरलक्ष ठेवणे आणि कृतज्ञ राहणे यांचा समावेश होतो.केंब्रिजने ‘ह्यूमन’ची निवड केली आहे. कोणतीहीडिक्शनरी एखादा शब्द उगाचच निवडत नाही; तर ती त्याकाळाचा आवाज ऐकते आणि ऐकवते. सोबतच त्याचाअर्थही स्पष्टपणे समजावून सांगते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
