शेखर गुप्ता यांचा कॉलम:कॉर्पोरेट इंडियासाठी पुढचा मार्ग कसा असेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्कीच्या वार्षिकसर्वसाधारण सभेत कॉर्पोरेट इंडियाला कडक शब्दांतसुनावले. पंतप्रधान राग, निराशा आणि अगदी हतबलतेच्यासुरात बोलत होते. तुम्हाला सक्रिय करण्यासाठी मी आताआणखी काय करू, असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता.एखाद्या लष्करी जनरलने स्फूर्तिदायक भाषणे देऊन आणिसैन्याचे ‘स्पिरिट’ वाढवूनही समोरची टेकडी जिंकण्यातअपयशी ठरलेल्या आपल्या सैन्याला फटकारावे, तसेच हेकाहीसे होते. उद्योजकता वाढवण्यासाठी कोणतेही सरकारकाय करू शकते? ते बरेच काही करू शकते- नियंत्रणांतूनमुक्ती, किमान सरकारी हस्तक्षेप, बाजारावर देखरेख,आर्थिक शिस्त, परवान्यांतून मुक्ती आणि गुंतवणुकीवरीलनिर्बंधांतून मुक्ती. ‘स्पिरिट’ वाढवणाऱ्या या पॅकेजमध्येकरकपात नक्कीच प्रभावी ठरते. पंतप्रधानांच्या निराशेचे एक मोठे कारण म्हणजे, कॉर्पोरेटइंडिया या फायद्यांचा वाटा आपल्या कर्मचाऱ्यांच्यावेतनवाढीत, अधिक रोजगार निर्मितीत किंवा गुंतवणुकीच्यारूपात देत नाही. कॉर्पोरेट नफ्यात वाढ होऊनही असेघडलेले नाही. ही फौज टेकडीवर हल्ला करायला एक तरतयार नाही, किंवा खूप घाबरलेली आहे; अथवा करातीलसवलत स्वतःच्या खिशात घालून सुरक्षित असल्याच्यासमाधानातच राहू इच्छिते. पंतप्रधानांनी जे सांगितले,त्याकडे लक्ष द्या. ते म्हणाले, 2014 मध्ये बेसिक कॉर्पोरेट टॅक्सचा दर 30टक्के होता. आम्ही तो कमी करून 22 टक्के केला. आजभारतात 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही इन्कमटॅक्स लागत नाही. मला माहीत आहे, तुम्ही यावर टाळ्यावाजवणार नाही, कारण तुम्हाला कितीही दिले तरी तुमचेपोट भरत नाही. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवलेका? त्यांची संख्या वाढवली का? नाही. ‘मोदीजी, तुम्हीकरा, आम्ही पाहतो’ अशी तुमची वृत्ती आहे. आता कॉर्पोरेट इंडिया आपल्या जखमांवर फुंकर घालत असताना काँग्रेसने पंतप्रधानांचे शब्द अचूक पकडले आहेत. जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये याकोंडीसाठी उद्योग जगताला नाही, तर सरकारलाचजबाबदार धरले. यासाठी त्यांनी वशिलेबाजीचीभांडवलशाही, नियमांचा फास, भीतीचे वातावरण आणितपास यंत्रणांना दिलेली मोकळीक यांना कारणीभूत ठरवले. अमेरिकेत राहुल गांधी यांनीही ‘आम्ही तर आधीचसांगितले होते’ अशी प्रतिक्रिया दिली. येथे मी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर काही बोलण्याच्या मनःस्थितीत नाही. आपल्याला माहीत आहे की कॉर्पोरेट इंडियाने 7 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे, पण त्या प्रमाणात तो गुंतवणूक किंवा विस्तार करत नाही, रोजगार वाढवत नाही. स्टार्टअप कंपन्या वाढत आहेत, मात्र उद्योजकतेवर बर्फ साचला आहे. बहुतांश वाढ सरकारी खर्चाच्या, विशेषतः मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्चाच्या जोरावर होत आहे. पण जर कॉर्पोरेट इंडिया जोखीम पत्करण्यापासून इतके दूर पळताना दिसत असेल, तर हे अचानक घडलेले नाही. हे वातावरण अनेक वर्षांपासूनआहे. काही जण मागणीत घट झाल्याची तक्रार करतात, तर काहींचे म्हणणे आहे की नियमांनी त्यांचा गळा आवळलाआहे. आजही अनेक लहानसहान गोष्टींसाठी अनेक फॉर्मभरावे लागतात; अगदी निर्यातीसारख्या चांगल्या गोष्टीच्यापरवानगीसाठीही. कारण रिझर्व्ह बँकेला देशात येणाऱ्याप्रत्येक डॉलरवर नजर ठेवायची असते. आणि हो, प्रत्येकअर्जाच्या तीन प्रती भराव्या लागतात. सरकारने धोरणांमध्येकिरकोळ सवलती दिल्या असतील, पण नोकरशाहीचीपकड अधिकच घट्ट झाली आहे. गुगलची मदत न घेताझटकन एक कोडे सोडवा. तुम्ही खाण मंत्रालय, औषधमंत्रालय आणि पोलाद मंत्रालयाच्या मंत्र्यांची नावे सांगूशकता का? मी या तिन्हींचा उल्लेख यासाठी केला, कारणपंतप्रधानांनी विशेषतः या क्षेत्रांतील कॉर्पोरेट इंडियाच्याअपयशावर भर दिला : आपण लोहखनिजासारख्या कच्च्यामालाची निर्यात का करतो? आपल्याकडे बॉक्साइटचाखजिना आहे, तरीही आपण तयार स्टील आणि विशेषॲल्युमिनियम ॲलॉयची आयात का करतो? आपण मोठ्याप्रमाणावर औषधांची निर्यात करतो, तरीही ‘एपीआय’साठी(औषधे बनवण्याचे साहित्य) चीनवर का अवलंबूनआहोत? परंतु सत्ता पीएमओपर्यंत मर्यादित राहिली आहे,ज्याच्यावर स्वतःचाच इतका भार आहे की ते प्रत्येकगोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे निर्णय नोकरशाहीघेते. कॉर्पोरेट इंडियाने या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. ते अशा पद्धतीने काम भागवून नेत आहेत, जी त्यांनासर्वात चांगली माहीत आहे : नफ्यातील काही हिस्सा अशाप्रकारे वाटणे की तो कायदेशीरदृष्ट्या वैध आणि स्वच्छदिसेल, पण त्यातून बरेच काही सूचित होते. विशेषतः अर्थमंत्रालयातून निवृत्त होणाऱ्या सचिवांची संख्या पाहा, ज्यांनीप्रभावशाली कंपन्यांच्या बोर्डावर जागा मिळवली आहेकिंवा खाजगी क्षेत्रातील अनेक बँकांचे व शेअर बाजारातसूचिबद्ध नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे अध्यक्ष बनले आहेत. सरकार आर्थिक सुधारणा तर करत आहे, पण ते जेवढ्यासुधारणा करण्याचा विचार करते, त्यापेक्षा जास्तनोकरशाहीचे हात बळकट होतात. कॉर्पोरेट इंडिया संकेतदेऊन आधीच तिच्याशी तडजोड करून घेते. हाचविरोधाभास आहे. याचा परिणाम असा होतो की, वरच्यापातळीवर जे विकेंद्रीकरण होते, ते मध्येच येऊन थबकते.सरकार धोरणात्मक गोंधळापासून अलिप्त नाही. 1991 नंतरचे सर्वच अर्थमंत्री हेच सांगत आले आहेतकी, आर्थिक सुधारणांचा गाभा म्हणजे संतुलित आणिअंदाजित करप्रणाली. ही गोष्ट तुम्ही या सरकारबद्दल म्हणूशकत नाही, कारण हे सरकार कंपन्यांवर ज्या दराने करलावते, त्याच्या जवळपास दुप्पट दराने व्यक्तींवर कर लावते.याचे ठळक उदाहरण म्हणजे, त्यांनी ‘सॉवरेन गोल्डबॉन्ड’वरील कॅपिटल गेन्स टॅक्सच्या सवलतीमध्ये पूर्वलक्षीप्रभावाने बदल केले. 2007 मध्ये ‘सीआयआय’च्या सर्वसाधारण सभेतपंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही कॉर्पोरेट नेत्यांना ते स्वतःमोठे वेतन घेतात म्हणून फटकारले होते. विडंबना अशी आहेकी, त्या वेळचे वातावरण आणि संदेश आजच्या अगदीउलट होते. त्या वेळी ‘सीआयआय’चे प्रमुख सुनील मित्तलयांनी याला उत्तर म्हणून आपल्या वेतन-बोनसचा मोठाहिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी मीलिहिले होते की, कॉर्पोरेट इंडियाने पंतप्रधानांना सांगायलाहवे होते की ते त्यांचे वेतन ठरवत नाहीत. जर तेप्रामाणिकपणे कर भरत असतील, तर त्यांना त्यांच्या वाटेवरसोडून द्यावे. अर्थात, असे काहीही घडले नाही. कॉर्पोरेटइंडियाने ‘सीएसआर’सारखा प्रतिगामी विचारहीस्वीकारला. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) वाढीच्या प्रमाणात गुंतवणूक नाहीआपल्याला माहीत आहे की कॉर्पोरेटइंडियाने 7 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवलीआहे, पण त्या प्रमाणात तो गुंतवणूक किंवाविस्तार करत नाही, रोजगार वाढवत नाही.स्टार्टअप कंपन्या वाढत आहेत, मात्रउद्योजकतेवर बर्फ साचला आहे. बहुतांशवाढ सरकारी खर्चाच्या, विशेषतः मोठ्यापायाभूत सुविधांच्या जोरावर होत आहे.
