रश्मी बन्सल यांचा कॉलम:जर तुमचे ‘चारित्र्य’ चांगले असेल तर बाहेरचा धोका कमी
कल्पना करा की, जगापासून दूर डोंगरावर एक माणूस एकापायावर उभा राहून तपश्चर्या करत आहे. त्याची शक्तीवाढत चालली आहे, आता त्याला कुणीही रोखू शकत नाहीअसे वाटते. अशातच त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी एकअप्सरा येते. अनेक दिवस तो तपस्वी अजिबात विचलितहोत नाही, पण एके दिवशी त्याचे मन मोहाला बळी पडते.तो हळूच एक डोळा उघडतो आणि बस, अप्सरेचा बाणथेट निशाण्यावर लागतो. वर्षानुवर्षांची तपश्चर्या वाया जातेआणि तो तपस्वी पुन्हा एक सामान्य माणूस बनतो. ही कोणतीही पौराणिक कथा नाही. नुकतेच अमेरिकेतीलसर्वात शक्तिशाली कंपनीच्या मालकासोबत नेमके हेचघडले आहे. तुम्ही म्हणाल, ते कोणत्या डोंगरावर चढूनतपश्चर्या करत होते? तर माझे असे मानणे आहे की,स्वतःचे स्टार्टअप सुरू करणे ही एक प्रकारची तपश्चर्याचआहे. जग एका वाटेवर असते, तर तुम्ही वेगळ्याच वाटेवरअसता. माणसाच्या डोक्यावर इतक्या जबाबदाऱ्या असतातकी, त्या बॅलन्स करणे म्हणजे एका पायावर उभेराहिल्यासारखेच वाटते. खूप संघर्ष करावा लागतो; जगाशीआणि स्वतःशीही, तेव्हा कुठे यश मिळते. आणि मग येतेमोहित करणारी अप्सरा! 33 वर्षांच्या तपश्चर्येतून जेन्सेन हुआंग यांनी एक अशीकंपनी उभी केली, जिच्या जोरावर संपूर्ण एआय क्रांतीटिकून आहे. पण कदाचित ते हे विसरले की, ज्याला देवशक्तीचे वरदान देतो, त्याच्यासमोर एक अप्सराही प्रकटहोते! जेन्सेन यांचा पाय घसरला आणि त्यांचे जगच बदलूनगेले. कंपनी हातातून गेली आणि प्रतिष्ठाही. लोक त्यांच्याचएआयचा वापर करून, मीम्स बनवून त्यांचीच खिल्लीउडवत आहेत! माणसाने तोंड तरी कुठे लपवावे? असो, माझ्या सांगण्याचे तात्पर्य इतकेच की, कुणी कितीहीश्रीमंत असो किंवा शक्तिशाली असो, पण सृष्टीचा नियमआहे – त्याचीही परीक्षा होतेच! तपश्चर्येत मग्न राहायचे कीडोळे उघडायचे, हा निर्णय तो स्वतः घेतो. डोळेउघडल्यानंतरही, जे आपल्याला मोहात पाडत आहे त्याकडेदुर्लक्ष करण्याची संधी त्याच्याकडे असते. आंतरिक शक्तीयालाच म्हणतात. पण एकदा का पाय घसरला, तर मग तुम्ही बाहेरच्या जगालाकितीही फसवण्याचा प्रयत्न करा, ती शक्ती आतातुमच्याकडे राहिलेली नसते. जेन्सेन यांच्या कथेत एकनाही, तर अनेक ‘अप्सरा’ समोर आल्या आहेत. पण मोहातपाडणारी व्यक्ती ही कुणी जिवंत, सुंदर स्त्रीच असेल असेनाही. मनाचे अनेक मोह असतात, पैशाची अनेक प्रलोभनेअसतात. ही सर्व ‘अप्सरेची’च रूपे आहेत; म्हणजेचतपश्चर्या भंग करणारी साधने. तुम्ही म्हणाल, मी तर तसाही सामान्य माणूस आहे, माझा यासगळ्याशी काय संबंध? तर मी म्हणेन की, या पृथ्वीवर जोकुणी मनुष्यरूपात जन्माला आला आहे, तो इथे तपकरण्यासाठीच आला आहे. सुरक्षित राहायचे असेल, तरतुम्हालाही योग्य निवड करावीच लागेल. अप्सरा येते,मनाला भुरळ घालते. फोन पुन्हा पिंग होतो, तुमचाएकाग्रतेचा भंग होतो. लग्नानंतर डेटिंग करताय, जगाच्यानजरेला घाबरताय. बँक बॅलन्सपेक्षा मोठे असते कॅरेक्टर. पुराणांमध्ये म्हटले आहे की, कठोर तपश्चर्या हीदेवलोकासाठी समस्या बनत असे. देवलोक डळमळीतव्हायचा, इंद्रदेव अस्वस्थ व्हायचे. आजही कुणाची प्रगतीपाहून लोक हादरतात आणि त्याला पडताना पाहूनसुखावतात. पण लक्षात ठेवा, बाहेरचा धोका कमी आहे,जर तुमच्या कॅरेक्टरमध्ये दम आहे!अप्सरा येईल, तिलाअजिबात भाव देऊ नका. आपल्या जवळही येऊ देऊ नका.(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
