November 29, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:बचतीतून अधिक कमाई करण्याचे कौशल्य शिका

0
1794740313_file_1794682691260.jpg

दोन वर्षांत प्रथमच किरकोळ महागाईने आरबीआयची कमाल सहनशीलता पातळी ओलांडून 6.09% वर झेप घेतली आहे. सामान्य भारतीय कुटुंबासाठी याचा अर्थ काय? जर एखाद्याला 5% पगारवाढ मिळाली व घरगुती खर्च 6.09% च्या दराने वाढत असेल, तर खरेदी क्षमता घटते. दुसरीकडे, एल निनोमुळे कुठे दुष्काळ तर कुठे पुराची परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होण्याचा धोका आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक उत्पादन 6.09% ने महाग झाले आहे. जसे, कांदा 116% महाग, तर बटाट्याचे भाव 14% नी कमी आहेत. आता हा दबाव स्वयंपाकघर, रुग्णालये, शाळा, गॅरेज व रेस्टॉरंटपर्यंत वाढत आहे. शहरी कुटुंबांसाठी आरोग्यसेवेचा खर्च वार्षिक 14% च्या दराने वाढत आहे. किरकोळ महागाईच्या दुप्पट वेगाने. जर एखादे कुटुंब आरोग्यसेवेवर दरमहा ~1,000 खर्च करत असेल, तर हा खर्च एका वर्षात वाढून ~1,140 व 3 वर्षांत वाढून ~1,482 होईल. ज्येष्ठ व पुरेसा आरोग्य विमा नसलेल्या कुटुंबांसाठी हे त्रासदायक ठरू शकते. एक धोका ज्याकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात, तो म्हणजे बचत खात्यात पडून असलेला पैसा. जर मिळणारे व्याज महागाई दरापेक्षा कमी असेल, तर त्याची क्रयशक्ती कमी होते. अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे की, आरबीआय डिसेंबरमध्ये होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदर वाढवण्याचा विचार करू शकते. असे झाल्यास घर, कार व इतर कर्ज महाग होऊ शकतात. वाढलेला ईएमआय आधीच वाढत्या खर्चाशी संघर्ष करत असलेल्या कुटुंबांवरील ओझे आणखी वाढवेल. त्यामुळे केवळ खर्चात कपात करणे हे यावरील उत्तर नाही. शहाणपण यातच आहे की बचतीला कामाला लावले पाहिजे. पुरेसा आपत्कालीन निधी सुरक्षित ठेवून, अतिरिक्त बचतीचा वापर महागडे कर्ज फेडण्यासाठी करा. विचाराशिवाय खरेदी व अन्ननासाडी टाळून स्मार्ट किराणा ग्राहक बना. वीज बिल, मोबाइल प्लॅन, ओटीटी सबस्क्रिप्शन, विमा प्रीमियम व क्रेडिट कार्डच्या शुल्काचा आढावा घ्या. ज्या सेवांचा वापर क्वचितच होतो, त्या रद्द करा. वार्षिक करार रिन्यू करण्यापूर्वी दराची तुलना करा. छोटी-छोटी मासिक बचत वर्षभरात बरीच मोठी होऊ शकते. मॅनेजमेंट टिप: महागाई स्वयंपाकघराच्या बजेटलाच खिंडार पाडत नाही तर ती कुटुंबाच्या जीवनमानावरही परिणाम करत आहे. खर्च कमी करणे हा उपाय नसून, पैशांचे चांगले व्यवस्थापन करणे हा आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!