पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मुले दूर राहण्याच्या प्रयत्नात असतील,तर त्याकडे एक आव्हान म्हणून पाहा
नैराश्याने वयाची बंधने, ग्रामीण-शहरी दरी ओलांडली. आता तेमुलांच्या मनापर्यंत पोहोचले असून, ग्रामीण भागांतही पसरले.ग्रामीण वातावरणात अनेकदा उपचारांसाठी मदत घेणे, आजाराचीओळख पटणे कठीण असते, तरीही तिथे नैराश्याचे अस्तित्वजाणवते. शहरांत असोत, गावांत, प्रौढ व्यक्ती कदाचित कालांतरानेनैराश्याचा सामना करण्याचे मार्ग शोधून काढतात , परंतु जेव्हा मुलेयाच्या विळख्यात सापडतात, तेव्हा परिस्थिती चिंताजनक बनते. अनेक घरांत, नैराश्यामुळे मुलांनी पालकांशी संवाद साधणे बंद केले.त्याला ‘ घोस्टिंग” म्हटले जाते. मुले स्वतःच्या विश्वात हरवत आहेत, ज्यामुळे पालक थकलेले हतबल झाले. वस्तुतः, ही समस्यापालकांच्या आरोग्यावरही परिणाम करू लागली. जर मुले नैराश्याशीझुंजत असतील, सोशल मीडियामुळे भरकटली असतील,स्क्रीनसमोर अति वेळ घालवत असतील, दुसरीकडे पालक खच्चीझाले असतील तर याचे परिणाम काय होतील? आधुनिकजीवनशैलीतील बदलांचा विचार करता, जर मुलांनी पालकांशीसंवाद तोडला म्हणजेच ‘घोस्टिंग” सुरू केले, त्यांना आयुष्यातून दूरठेवले, तर पालकांनी याकडे समस्या म्हणून न पाहता, आव्हानम्हणून पाहावे, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा.
