मकरंद परांजपे यांचा कॉलम:अमेरिकेमध्ये भारतीय वंशाच्या लोकांबद्दल द्वेष का वाढला आहे?
अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांना कदाचित गेल्याअर्ध्या शतकातील द्वेषाच्या सर्वात भीषण लाटेचा सामनाकरावा लागत आहे. वाढता अस्मितावादी कलअसलेला समाजवादी डावा पंथ, संतापाने भरलेला, भूतकाळातील गौरवगानात अडकलेला उजवा पंथ यादोघांत भारतीय वंशाचे अमेरिकन अस्वस्थ स्थितीतपाहत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिकउपलब्धी त्यांना संशय, असूया, द्वेषाचे लक्ष्य बनवत आहेत. 11 ऑक्टोबरला शिकागो जवळच्या ऑरोरामध्ये19 वर्षांच्या अलेक्झांड्रोस पापोराकिस नावाच्या एकायुवकाने- जो स्वतःला ‘नियो-नाझी” सांगतो- एकामंदिराबाहेर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. नशीबअसे की त्याची रायफल जाम झाली. पोलिसांनी त्यालाअटक केली. अशा प्रकारे श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातपूजा-अर्चा करत असलेले शेकडो हिंदू नरसंहारापासूनवाचले. त्या दिवशी मंदिरात पूजा करणाऱ्यांत डेमोक्रेटिकखासदार राजा कृष्णमूर्ती, त्यांचे कुटुंबही होते. दुसऱ्याबाजूला, ओहायोत रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गव्हर्नरपदाचे उमेदवार विवेक रामास्वामी निवडणूक हरले. याचेकारण त्यांच्या टीमने डेमोक्रेटिक प्रतिस्पर्धी एमीएक्टनबद्दल जारी केलेली अरुचिकर जाहिरात असण्याव्यतिरिक्त हे असू शकते की हे मध्य-पश्चिमराज्य- जिथे गोरे बहुसंख्याक आहेत- कदाचित भारतीयवंशाच्या हिंदूला गव्हर्नर म्हणून स्वीकारण्यात सहजराहिले नसावे. रामास्वामींच्या विरोधात जनमतवळवण्यासाठी कारण पुरेसे ठरू शकत होते- मग तेत्यांचे शाकाहारी असणे असो, घरात अनवाणी चालणेअसो. भारतवंशी अमेरिकेतील इमिग्रंट समुदायांपैकीएक आहेत. प्यू रिसर्च सेंटरनुसार, 2023 मध्ये भारतीयवंशाचे प्रमुख कुटुंबांचे वार्षिक सरासरी उत्पन्न 1,51,000डॉलरपेक्षा जास्त होते. त्यांच्या शैक्षणिक, व्यावसायिकउपलब्धी तितक्याच प्रभावी आहेत. परंतु अमेरिकनसमाजात भारतवंशीयांच्या योगदानाचा उत्सव साजराकरण्याऐवजी, ‘मागा”चे काही भाग त्यांना प्रतिस्पर्धीम्हणून पाहू लागले. त्यांना अशा घुसखोरांप्रमाणे पाहिलेजात आहे, जे अमेरिकन गोऱ्यांच्या नोकऱ्या हिसकावूनघेत आहेत. ‘मागा”च्या भारत-विरोधी मानसिकतेतख्रिश्चन कट्टरतेसह वर्णद्वेषाचे घटकही आहेत. परंतु यामागे राजकीय गणितही असू शकते. भारतवंशीपारंपरिकरीत्या डेमोक्रेटिक पार्टीकडे कल ठेवत आले .त्यामुळे ‘मागा”चे रणनीतीकार असा विचार करतअसावेत की अशा समुदायाला आपल्या बाजूनेकरण्याचा प्रयत्न तरी का करावा, जो कसाहीरिपब्लिकन्सना मतदान करणार नाही? जरी रामास्वामीउषा व्हेन्स याचा पुरावा आहेत की रिपब्लिकन गोटातहीभारतवंशीयांची उपस्थिती वाढली. ट्रम्प प्रशासनानेनवीन एच1बी व्हिसावर अनेक अडथळे आणले आहेत.परंतु इमिग्रेशन व्यवस्थेत सुधारणा करणे ही एक गोष्टआहे, इमिग्रंट्सना व्हिलनप्रमाणे सादर करणे दुसरी. अमेरिका त्या शास्त्रज्ञांना, अभियंत्यांना, डॉक्टरांना,उद्योजकांना हतोत्साहित करून तांत्रिक श्रेष्ठता टिकवूनठेवू शकत नाही, जे ती टिकवण्यास मदत करतात. अशास्थितीत भारतवंशीयांनी काय करायला हवे? उत्तर सरळआहे : संघटित व्हा, सहभाग घ्या, प्रभाव निर्माण करा.दीर्घ काळापासून या समुदायाचे लक्ष शिक्षण,व्यावसायिक प्रगती, उद्योजकता,कौटुंबिक समृद्धीवरकेंद्रित राहिले. राजकीय सक्रियतेची जबाबदारी त्यांनीइतरांवर सोडली. परंतु विशेषतः हिंदू अमेरिकनांनीधार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण घटनात्मक संस्थांच्यामाध्यमातून करायला हवे. सोबतच भारतवंशियांनीवांशिक सीमांच्या पलीकडे जाऊन भागीदारीही निर्माणकरायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी ओळखत्यांच्या हातून परिभाषित होऊ देता कामा नये, जे त्यांचाद्वेष करतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) अमेरिकन समाजात भारतवंशीयांच्यायोगदानाचा उत्सव साजरा करण्याऐवजी,‘मागा”चे काही भाग त्यांना प्रतिस्पर्धीम्हणून पाहू लागले. त्यांना अशाघुसखोरांप्रमाणे पाहिले जाते , जेगोऱ्यांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत.
