डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:केंद्र आणि राज्यांमधील उत्तम ताळमेळ देशासाठी आवश्यक
देशातील 65% जनता तरुण आहे. बेरोजगारीचा दरसुमारे 8% आहे. असे असून सरकारांचे लक्षसुशासनाऐवजी निवडणुकीच्या रणनीतींवरच जास्तआहे. ही परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे. मतदार याद्याअद्ययावत करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला जात आहे.यामुळे नागरिकांना पसंतीचे प्रतिनिधी निवडण्याच्याहक्कावर परिणाम होऊ शकतो, असा तर्क दिला जातो.शेवटी याचा परिणाम कोणत्या पक्षाचे सरकार स्थापनहोणार यावरही होतो. या प्रक्रियेमुळे मूलभूत लोकशाही हक्क हिरावून घेण्याचा धोका निर्माण होतो, अशा कोणत्याही घाईघाईने केलेल्या प्रक्रियेची सखोलतपासणी होणे गरजेचे आहे. दुसरी चिंता म्हणजे, लोकप्रतिनिधींनी आश्वासनांवरआणि राजकीय विचारांवर मते मागितली होती. त्यांनी त्याच्याशी बांधील राहणे अपेक्षित असते. परंतु वैयक्तिक किंवा सामूहिक पातळीवर वारंवार होणाऱ्या पक्षबदलांमुळे 52 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे तयारकेलेल्या पक्षंतरबंदी चौकटीचा मूळ आत्माच कमकुवतहोतो. सुशासनाच्या दृष्टीने आता याचा पुनर्विकारकरण्याची गरज आहे. एखादा निवडून आलेलाप्रतिनिधी पक्षाच्या चिन्हावर निवडून आला. मात्र त्यापक्षापासून वेगळा झाला, तर त्याला पुन्हा जनतेचा कौलघेणे अनिवार्य केले पाहिजे. असा नियम जबाबदारीचीभावना अधिक मजबूत करू शकतो. 1.4 अब्जलोकसंख्या व 32.8 लाख चौरस किलोमीटरक्षेत्रफळाच्या भारतासाठी मजबूत संघराज्य पद्धतअतिशय आवश्यक आहे. संघराज्य व्यवस्था ही चांगलाकारभार करणाऱ्या राज्यांना विकासाच्या विविधनिकषांवर उत्तम कामगिरी करण्याची संधी देते.अलिकडच्या वर्षांत संघराज्य व्यवस्था हळूहळूकमकुवत होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. 73व्या आणि 74 व्या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्यसंस्थांना बळकट केले होते. तसेच, विविध वित्तआयोगांनी राज्ये आणि स्थानिक संस्थांना अधिकअधिकार देण्यावर भर दिला होता. ‘अनटाईड फंड”मुळेस्थानिक स्वराज्य संस्थांना गरजेनुसार काम करण्याची,पायाभूत सुविधांमधील त्रुटी दूर करण्याची आणिआवश्यक सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची पूर्णस्वायत्तता मिळाली होती. परंतु, 15 व्या वित्त आयोगानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानाचा एक भागविशिष्ट कामांसाठीच राखीव ठेवून दिला. अशापरिस्थितीत एखाद्या पंचायतीने नळाद्वारे पाणीपुरवठाआणि शौचालयांची उपलब्धता यांसारखी उद्दिष्टेआधीच पूर्ण केली असतील, तर तो निधी तसाच नवापरता पडून राहू शकतो. केंद्रशासित प्रदेशांमध्येस्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी थेट पंचायतींशीसंबंधित विभागांना न देता गृह मंत्रालयामार्फतपाठवण्याच्या तरतुदीमुळे स्थानिक संस्थांच्या आर्थिकस्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 16 व्या वित्तआयोगात या गोष्टीचा पुनर्विचार व्हावा. राज्यांना केंद्रीयकरांमध्ये हिस्सा मिळत असला, तरी केंद्र पुरस्कृतयोजनांमधील बदलांमुळे राज्यांवर अतिरिक्त आर्थिकबोजा पडू शकतो. मनरेगा योजना याचे उत्तम उदाहरणआहे. अजून एक चिंताजनक बाब म्हणजेनिवडणुकीच्या प्रचारानंतरही कायम राहणारा राजकीयवादंग. निवडणुकीदरम्यान राजकीय स्पर्धा असणेस्वाभाविक आहे. परंतु जनादेश मिळाल्यानंतर सुशासनदेणे हीच पहिली आणि प्राथमिक जबाबदारी असलीपाहिजे. संघराज्य व्यवस्थेत केंद्र आणि राज्यांतवेगवेगळ्या पक्षांची सरकारे असणे अगदी स्वाभाविकआहे. पण विरोधी पक्ष हासुद्धा शासनप्रणालीचा एकमुख्य भाग आहे. तो सरकारवर बारकाईने लक्ष ठेवतो.त्यांना जबाबदार करतो. आपल्याला केंद्र आणिराज्यांमधील उत्तम ताळमेळाद्वारे सुशासनावर लक्षकेंद्रित करावे लागेल. असा ढाचा स्थानिक गरजासमजून घेण्यासाठी आणि त्यानुसार योग्य पावलेउचलण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. संघराज्यव्यवस्थेचा आदर करणे, मानवी विकासाचे निकषसुधारणे, निवडणुकीनंतर होणाऱ्या पक्षांतरावर आळाघालणे यातच पुढचा मार्ग सामावलेला आहे. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत) भारतासारख्या संघराज्य व्यवस्थेत केंद्रआणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीयपक्षांची सरकारे असणे स्वाभाविक आहे.पण विरोधी पक्षसुद्धा शासनव्यवस्थेचाचएक महत्त्वाचा भाग असतो. तो सरकारवरलक्ष ठेवतो आणि त्यांना संविधानालाउत्तरदायी बनवून ठेवतो.
