November 29, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:भावनात्मक निर्णयावर खर्च करण्यापूर्वी थांबा

0
1794245721_file_1794081337391.jpg

दिवाळीत आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्यासाठी शेकडो-हजारो मैलांचा प्रवास करणाऱ्या भारतीयांचे प्रेम खरोखरच भावुक करणारे आहे. पण या आनंदासाठी मोठी किंमत मोजावी लागते. मात्र यातून चिंता वाढू शकते. दिवाळीच्या काळात आखाती देश व युरोपातून भारतात येणाऱ्या विमानांचे भाडे 400 टक्क्यांनी वाढले आहे. एरवी दुबईहून भारतासाठी एकतर्फी तिकीट 13 हजार ते 39 हजार रुपयांना मिळते. पण आता त्यासाठी दीड लाख रुपये मोजावे लागतात. तसाच प्रकार लंडन-हैदराबाद प्रवासाचा आहे. एरवी 69 ते 80 हजारांत मिळणारे तिकीट आता अडीच लाखांपर्यंत पोहोचले आहे. सणाच्या दिवसांत आई-वडील, मुले आणि प्रियजनांना भेटण्याची इच्छा होणे अगदी स्वाभाविक आहे. त्यावर कुणीच शंका घेऊ शकत नाही. पण आपण कुटुंबाला कधी भेटावे, हे कॅलेंडरनेच ठरवायचे का? त्यासाठी स्वतःच्या कष्टाच्या कमाईचा मोठा हिस्सा असा पाण्यात घालवायचा का? कदाचित आता आपल्याला विचार बदलण्याची गरज आहे. केवळ सणाच्याच दिवशी भेटण्याचा हट्ट धरण्यापेक्षा विमानाचे भाडे कधी स्वस्त आहे याचा अंदाज घेऊन प्रवासाचे नियोजन का करू नये? दिवाळी दरवर्षी येते. सणाच्या दोन आठवडे आधी किंवा नंतर आपण आपल्या माणसांना भेटलो, तरी प्रेमाचे मोल कमी होत नाही. विमान कंपन्या मानवी स्वभाव चांगला ओळखतात. भावना तीव्र असतात आणि हजारो लोकांना एकाच दिवशी प्रवास करायचा असतो, तेव्हा तिकिटांची मागणी प्रचंड वाढते. ‘डायनॅमिक प्रायसिंग’मुळे कंपन्या भाडे वाढवत जातात. नेमक्या याच वेळी आपण विवेकाने विचार करायला हवा. भावनेच्या भरात खिशाला कात्री लावणारा निर्णय घेण्यापूर्वी, स्वतःला थांबवून विचार करायला शिकले पाहिजे.कुटुंबासोबतच्या भेटीतून सुंदर आठवणी तयार झाल्या पाहिजेत. रिकामे बँक खाते किंवा महिनोन्‌महिने जाणारा आर्थिक ताण मागे उरता कामा नये. विविध तारखांच्या तिकिटांच्या दरांची तुलना करा. शक्य असल्यास आधी बुकिंग करा. गर्दीच्या दिवशी प्रवास करणे टाळा. बचतीच्या पैशांतून तुम्ही आपत्कालीन निधी मजबूत करू शकता किंवा विमा प्रीमियम भरू शकता. आपण पैसे कमावण्यासाठी अपार कष्ट करतो. म्हणूनच ते खर्च करतानाही तितकेच समजूतदार राहायला हवे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!