May 31, 2026

अमेरिका इराण युद्ध थांबले

0
20260408_141555

अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये युद्ध विराम झाल्यामुळे संपूर्ण जगामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ आणि चीन यांच्या मध्यस्थीमुळे हे दोन्ही देश या युद्धविरामाच्या निर्णयापर्यंत आलेले आहेत. जागतिक तेल बाजारावर या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झालेला आहे.
आज पहिल्याच दिवशी जागतिक तेल बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती २५ % कमी झालेल्या आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या युद्धविरामामुळे संपूर्ण जगामध्ये इंधन टंचाई चे संकट दूर झालेले आहे.
जागतिक शेअर मार्केटमध्येही सकारात्मक वातावरण तयार झालेले आहे.
संपूर्ण जगावरती जे तिसऱ्या महायुद्धाचे संकट तयार झाले होते ते आता दूर झालेले आहे.
भारतासारख्या संपूर्णपणे परकीय इंधनावरती अवलंबून असणाऱ्या देशांना या युद्धविरामाचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
अमेरिका आणि इराणच्या या निर्णयामुळे संपूर्ण जगावरील तेल संकट दूर झालेले आहे. पुढील फेऱ्या या पाकिस्तान मधील इस्लामाबाद मध्ये पार पडणार आहेत.
सध्या दोन्ही देशाकडून अटी शर्तींचा मसुदा तयार केला जात आहे.
सध्या इराणने हार्मोन्स समुद्रध्वनी सर्वांसाठी खुला केलेला आहे. त्यामुळे सर्व देशांची तेलवाहू जहाजे आपापल्या देशाकडे रवाना झालेली आहेत.
१० एप्रिल रोजी युद्धविराम बैठक पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये होणार आहे. दोन्ही देशांच्या अटी शर्ती वरती अंतिम मसुदा या बैठकीमध्ये काढण्यात येणार आहे. युद्ध विरामाच्या अंतिम मसुद्यामध्ये चीनची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

इराणने आपला १० अटी शर्तींचा मसुदा तयार केलेला आहे.या दोन्ही देशांच्या या अंतिम मसुद्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
भारताने अमेरिका इराण युद्धविरामाचे स्वागत केलेले आहे.
युद्धविरामामुळे जागतिक तेल बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरेल १०० डॉलर पेक्षाही खाली आलेल्या आहेत.
जगभरातून अमेरिका इराण शस्त्रसंधीचे स्वागत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
तुकाराम खोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *