July 4, 2026

शेखर गुप्ता यांचा कॉलम:भविष्यातील आव्हानांकडे दुर्लक्ष करू नका‎‎‎‎‎‎‎‎‎

0
tm6osc_1781636931.jpg

नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ भारताचे निर्वाचित‎पंतप्रधान राहण्याचा जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम‎मोडला. गेल्या काही दिवसांत ही चर्चा खूप रंगली आहे.‎देशासाठी कुणी जास्त काम केले, यावरून मोदी आणि‎नेहरू यांची बरीच तुलना केली जात आहे. पण आतापर्यंत‎जे काही झाले आहे, त्याऐवजी आपण भविष्याकडे पाहणे‎अधिक चांगले ठरेल. कारण मोदींचे काम अजून संपलेले‎नाही. त्यांच्या या कार्यकाळाची अजून तीन वर्षे बाकी‎आहेत. ते 2029 मध्येही उमेदवार असतील, ही गोष्ट पक्की‎आहे. कुणी सांगावे, ते कदाचित 2034 मध्येही उमेदवार‎असू शकतील!‎ इतका प्रदीर्घ काळ सत्तेत राहणाऱ्या कोणत्याही‎पंतप्रधानाप्रमाणे मोदींनाही अनेक संकटांचा सामना करावा‎लागला आहे. यातील तीन संकटे जागतिक होती. ती म्हणजे‎कोविड, युक्रेन आणि पश्चिम आशियातील युद्ध. ट्रम्प‎यांच्या उर्वरित कार्यकाळाशी कसे जुळवून घ्यायचे, हे‎त्यांच्यासमोरील आणखी एक आव्हान आहे. आतापर्यंत‎मोदींनी अत्यंत संयमाने त्यांचा सामना केला आहे.‎अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांकडून संकेत घेत शांत राहण्याची‎आणि कोणत्याही चिथावणीला बळी न पडण्याची रणनीती‎त्यांनी अवलंबली आहे.‎ आगामी काळात देवाणघेवाणीचा मुद्दा अधिक महत्त्वाचा‎होत जाईल. भारत हे चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. पश्चिम‎आशियातील युद्धाने हे स्पष्ट केले आहे की, भारताने आपली‎बाजू निवडली आहे. ती बाजू म्हणजे इस्रायल, अमेरिका‎आणि युएई. भारत हे कधीही उघडपणे मान्य करणार नाही,‎पण त्यांची पावले हेच स्पष्ट करतात. अमेरिकेसोबतचा‎अंतरिम व्यापार करार कधीही होऊ शकतो. व्यावसायिक‎संबंध आणि व्यापार भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्राच्या सक्रिय‎पाठिंब्याने सुरूच राहतील. ट्रम्प यांनी कितीही चिथावणी‎दिली किंवा मोदींच्या विरोधकांनी कितीही टीका केली, तरी‎मोदी चिथावणीला बळी पडणार नाहीत, असे आपण ‎‎सर्वसाधारणपणे मानू शकतो. पण भविष्यात एखादे मोठे‎संकट कधी ना कधी उभे राहू शकते.‎ पाकिस्तानी नेत्यांनी ट्रम्प यांच्यासाठी इतके काही केले‎आहे की, केवळ त्यांच्या फील्ड मार्शलच्या कौतुकाने ते ‎‎समाधानी होणार नाहीत. बक्षीस म्हणून अमेरिकेने काश्मीर ‎‎प्रश्नाचा उल्लेख करावा, अशी त्यांची इच्छा असू शकते.‎मग तो उल्लेख अस्पष्टपणे किंवा ‘ट्रुथ सोशल’वरील‎एखाद्या पोस्टच्या रूपात का असेना. त्यांच्या फील्ड‎मार्शलची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडली आहे.‎तसेच त्यांच्या पश्चिम सीमेवर तणावाचे वातावरण आहे.‎त्यांना या सगळ्यातून सुटका हवी आहे. काश्मीरचा मुद्दा‎पुन्हा उकरून काढण्यात मुनीर यांना ही सुटका दिसू शकते. ‎‎मोदी या आव्हानाला कसे सामोरे जातील? या आव्हानाला ‎‎सामोरे जाण्याची वेळ आता आली आहे. यासाठी आगामी ‎‎अडीच वर्षे धोरणात्मक संयम बाळगण्याची गरज आहे.‎ हा संयम सार्थ ठरवण्यासाठी आणि तो टिकवून ‎‎ठेवण्यासाठीही सामरिक ताकदीची गरज असते. मोदींनी जर ‎‎त्यांच्या मागील 12 वर्षांच्या कारभारावर नजर टाकली, तसेच ‎‎नेहरू आणि 1962 चे युद्ध थोड्या वेळासाठी विसरलो, तरी‎त्यांना मान्य करावे लागेल की त्यांनी संरक्षणावर पुरेसा खर्च‎केलेला नाही. जो निधी उपलब्ध होता, तोही खरेदी‎प्रक्रियेतील किचकट अडथळ्यांमुळे पूर्णपणे खर्च होऊ‎शकला नाही. असे अनेक अडथळे आजही कायम आहेत.‎ अनेक सुधारणा लागू होणार आहेत. विशेषतः खासगी‎क्षेत्रासाठी दारे उघडणाऱ्या सुधारणा होतील. पण त्यांचे‎परिणाम दिसण्यासाठी वेळ लागेल. तोपर्यंत त्वरित कारवाई‎करण्याची तयारी दिसली पाहिजे. कारण मुनीर कधीही‎आक्रमक होऊ शकतात. यासाठी सहा महिने, दोन वर्षे‎आणि पाच वर्षे अशा दीर्घकालीन योजनांची आवश्यकता‎आहे. अर्थव्यवस्था हाच सर्व धोरणात्मक आणि सामरिक‎ताकदीचा मुख्य आधारस्तंभ असतो. ‘आपण सर्वात वेगाने‎वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहोत’, या समाधानात भारत‎दीर्घकाळापासून रमत आला आहे. पण ज्या देशाची‎लोकसंख्या एवढी मोठी आहे आणि जो दरडोई उत्पन्नाच्या‎बाबतीत जगात 144 व्या ते 149 व्या स्थानावर झुलत आहे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎त्या देशासाठी केवळ एवढेच पुरेसे नाही. भारताने यापेक्षा‎अधिक चांगली कामगिरी केली पाहिजे.‎ पंतप्रधानांनी ‘किमान सरकार’ हे आपले आश्वासन‎आठवले पाहिजे. तसेच ‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम‎नाही’ आणि ‘काही धोरणात्मक बाबी वगळता सरकार सर्व‎क्षेत्रांमधून बाहेर पडेल’, या कोरोना काळात दिलेल्या‎त्यांच्या विधानाचीही त्यांना आठवण ठेवावी . मात्र गेल्या‎काही वर्षांत याच्या अगदी उलट घडत आले आहे.‎त्याऐवजी अनेक नवे सरकारी उपक्रम तयार केले गेले‎आहेत.‎ जेव्हा जेव्हा या सरकारवर संकट आले आहे, तेव्हा तेव्हा‎त्यांनी आपली चुकीची पावले मागे घेण्याची क्षमता‎दाखवली आहे. अनेक मुक्त व्यापार करार, बाँड्समधील‎परकीय गुंतवणुकीवरील कर मागे घेणे आणि आता मागील‎सर्व करार रद्द झाल्यानंतर एका नव्या, उदार द्विपक्षीय‎गुंतवणूक करारावर होणारी चर्चा यातून ही क्षमता स्पष्टपणे‎दिसून येते. जेव्हा एखादे सरकार संकटातून धडा घेऊन‎आपल्या धोरणांमध्ये इतक्या नाट्यमय पद्धतीने बदल‎करण्याची तयारी दाखवते, तेव्हा तो एक चांगला संकेत‎असतो. परंतु भारताला अशा अनेक पावलांची गरज आहे.‎उदाहरणार्थ खाणकाम, हायड्रोकार्बन्सचा शोध,‎शहरीकरण आणि घरांच्या छतावरील सोलार पॅनल‎यांसारख्या सोप्या बाबी. याबाबतीत पाकिस्तानही आपल्या‎पुढे आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधानांनी जाहीर‎केलेल्या ‘पीएम सूर्य घर योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी ही‎बाब पुरेशी ठरली असती. हिंदुत्वाच्या जोडीला विकासाचा‎दर हा निवडणुकीत नक्कीच विजय मिळवून देऊ शकतो.‎पण ती भारताच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाची कामगिरी ठरेल.‎ या यादीतील शेवटचे आव्हान राजकीयच असायला‎हवे. लोकसभेत 240 जागांच्या अल्पमतापासून सुरुवात‎करत मोदी-शाह यांच्या जोडीने उल्लेखनीय गती‎दाखवली आहे. तसेच भारताला जवळपास एकपक्षीय‎व्यवस्थेत बदलण्यात त्यांना यश आले आहे. पण‎राजकारणात कायम स्थिरता नसते. यातील बहुतांश ताकद‎ही नव्या मित्रपक्षांच्या खांद्यावर बसून किंवा अनेक छोट्या‎पक्षांमध्ये फूट पाडून मिळवली गेली आहे. कधी असेही‎होऊ शकते की एखाद्या मित्रपक्षाचा संयम सुटेल.‎राज्यांच्या राजधान्यांमध्ये ज्या नेत्यांच्या हाती सत्ता‎सोपवली आहे, त्यांच्यामुळे एखादा मुख्यमंत्री मोठे संकट‎निर्माण करू शकतो. तसेच, भाजपत आज उत्तराधिकारी‎हा शब्द कुणीही उच्चारत नसला तरी, 2029 जवळ येताच‎पक्षांतर्गत एका पूर्व निवड प्रक्रियेची मागणी जोर धरू‎शकते. 2034 मध्ये पन्नास ते साठ वयोगटातील किमान चार‎असे नेते असतील, जे त्या वेळी दावेदार असू शकतात.‎आज विरोधकांची जी अवस्था आहे, ती पाहता‎भाजपसाठी एखादे मोठे राजकीय आव्हान पक्षाच्या‎आतूनच उभे राहू शकते.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ वर्तमानापेक्षा चांगली कामगिरी…‎अनेक सुधारणा लागू होणार आहेत. विशेषतः‎खासगी क्षेत्रासाठी दारे उघडणाऱ्या सुधारणा‎नक्कीच होतील. पण त्यांचे परिणाम दिसण्यासाठी‎वेळ लागेल. यासाठी आपल्याला दीर्घकालीन‎योजना हव्यात. अर्थव्यवस्था हाच सर्व धोरणात्मक‎आणि सामरिक ताकदीचा मुख्य आधारस्तंभ‎असतो. अशा परिस्थितीत आपण वर्तमानापेक्षा‎अधिक चांगली कामगिरी केली पाहिजे.‎

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!